समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार आवश्यक:- सुनील केंद्रेकर

माहूर:- पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज असून या साठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा पुढाकार आवश्यक असल्याचे मत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केलं.
दिनांक ८ शुक्रवार रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे माहूर दौऱ्यावर आले असता प्रथम त्यांनी सह पत्नीक माता रेणुकाचे दर्शन घेऊन नियोजित विद्यार्थ्यांनी बनवलेले सीडबॉल व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रूई येथील निसर्ग रम्य दत्त टेकडी परिसरात पोहचल्या नंतर त्यांनी उपस्थिती अधिकाऱ्यांना सीडबॉल मध्ये कोण कोणत्या बियाचा वापर केला या बाबत विचारणा केली.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जावी म्हणून सध्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांतून सीडबॉल हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर व मुख्यकार्यकारी अधिकारी अधिकारी वर्षा घुगे – ठाकूर यांच्या कल्पनेतून राबविला जात आहे.या उपक्रमात मोठ्या आनंदाने सहभागी होत आहेत. याच उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थ्यांनी तब्बल अडीच हजार सीडबॉल तय्यार करून आणले होते,त्याची पेरणी रूई गावालगतच्या दत्त टेकडी वर करण्यात आली. यामध्ये चिंच, आंबा,नीम,जांभूळ,आदी बियांचा सीडबॉल समावेश होता.या उक्रमाची प्रशंसा करत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वृक्ष रोपण कार्यक्रम ही बाब आता सामान्य झाली असून त्याचे संगोपन आवश्यक आहे.या साठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले.या वेळी तहसीलदार तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार,शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे,रमेश गावंडे, गट समन्वयक संजय कांबळे,केंद्र प्रमुख येवतिकर,सुरेश मोकले,पोलाजी पानोडे,अजय राठोड,एस.एस.पाटील,भारत विराळे,आशिष माहुरे,सुधीर जाधव,संतोष चव्हाण, व्हीपी कदम,प्रमोद सराफ,संतोष केंद्रे,अनिल बॉम्पिलवार,विनोद सुरोषे, हेलंगंड,धनाजी मुंडकर, यांची उपस्थिती होती.