माहूर:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती माहूर शहरची बैठक १० रविवार रोजी स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेत पार पडली.या बैठकीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते नगर पंचायत चे पाणी पुरवठा सभापती अशोकजी खडसे यांची निवड करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती दर वर्षी माहूर शहरात उत्साहात साजरी करण्यात येते,गत दोन वर्षे कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती छोटेखानी सामाजिक उपक्रम घेऊन ही परंपरा संयोजन समितीने अबाधित ठेवली होती. यंदा मात्र विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा समितीचा मानस आहे. आज झालेल्या बैठकीत या बाबत साधक बाधक चर्चा होऊन सर्वानुमते नगर पंचायत चे पाणी पुरवठा सभापती अशोकजी खडसे यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष राजकुमार टाकळीकर ,सचिव ऋषीकेश खंदारे,कोषाध्यक्ष गणेश लोंढे, सदस्य दिपक भाऊ टाकळीकर, शिवाजी जोगदंड, अतुल खांनजोडे,अनिल जोगदंड प्रतीक कांबळे, सतिश उमाप, दशरथ उबाळे, अमोल जोगदंड, ओम खडसे, यांची निवड करण्यात आली आहे.