माहूर:- प्रेम, भक्ती व कृतज्ञता व्यक्त करत असताना त्याग, बलिदान,सेवा,समर्पणाचा संकल्प,वचन व इरादा व्यक्त करणे व यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हाच उद्देश ‘बकरी ईद’च्या निमित्ताने असतो.असे मत नगिना मस्जिद चे शाही इमाम यांनी व्यक्त केले.
बकरी ईद आणि आषाढी एकादशीचा पर्व रविवार रोजी एकाच दिवशी दोन्ही सण शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात माहूर शहरात साजरे करून माहूरच्या नागरिकांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे.सकाळ पासूनच पावसाची रिपरिप असल्याने शहरात ईदगाह ऐवजी जामा मस्जिद,नगिना मस्जिद,गौसीया मस्जिद,मदिना मस्जिद,सोनापिर दर्गाह मस्जिद आणि तानुषा भानुषा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांनी त्याग आणि संयमाची शिकवण देणाऱ्या ईद-उल-अजदहा ची नमाज आदा केली.या वेळी आपल्या प्रवचनातून नगिना मस्जिद च्या शाही इमामानी मातृभूमी,आपला देश, देशबांधव, आपली संस्कृती याविषयी प्रेम, आत्मीयता,आस्था,जिव्हाळा व सौहार्द हेच जीवनाचे, जगण्याचे गमक असल्याचे सांगितले.नमाज नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.या वेळी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी,नगिना मस्जिद चे सदर ताहेर शेख,माजी उपनगराध्यक्ष मुनाफ पटेल, हाजी कादर दोसानी, सय्यद नुर,जब्बार भाई साईवाले,अब्दुल रहमान शेख आली,रफिक घानिवाले,जमीर ठेकेदार,साजिद खाखरा,जुनेद दोसानी,शेख एजाज, सुफियान खाखरा, सैफ दोसानी, मुनिर भाई,रफिक गाईड,यांच्या सह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.