जनसामान्यांच्या हाकेला धावणारा कार्यकर्ता अमजद पठाण!

वाई बाजार:- जनमानसाशी संवाद साधताना शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणी आधार देणारे शब्द मन जिंकतात.आणी सामान्याच्या शब्दाला आधार देणारा कार्यकर्ता म्हणजेच अमजद पठाण वाईकर त्यांच्या शब्दा मध्ये सामान्य जनतेला आधार मिळत असल्यामुळे वाई बाजार आणि परिसराची सामान्य जनता त्यांच्या कडे नेहमी समस्या घेऊन येत असतात.

जनसामान्यांच्या शब्दाला आधार देऊन त्यांच्या समस्येचे सहजतेने समाधान करून प्रेम देणारा कार्यकर्ता म्हणजेच अमजद पठाण त्यांचा सहवासातून सामान्य जनतेला जिवन जगायला सोप होत आहे. सामान्य जनता आपल्या समस्या अमजद भाई यांच्या कडे घेऊन येत असतात व व्यक्त करत असतात. त्यांनी जनतेच्या समस्या सोडवून असंख्य मित्र बनवले आहेत ते जिवाभावाचे मित्र भाई ची कधीही साथ सोडणार नाहीत.ते सहकारी कार्यकत्यावर निस्वार्थ प्रेम करतात.त्यामुळेच वाई बाजार च्या अनेक कुटुंबात त्यांनी हृदयात,प्रेम,वात्सल्याचे स्थान निर्माण केले असून त्याला ते कधीही तडा जाणार नाही असे स्थान निर्माण केले आहे.अमजद भाऊ पठाण यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने असे मित्र बनविलेत की ते सावळी प्रमाणे सोबत असतात व आरश्या प्रमाणे सत्य माहिती देत असतात, कारण आरसा कधी खोट बोलत नाही आणी सावळी कधी साथ सोडत नाही…….

दिन दुबल्यांची गरजू व्यक्तींसाठी सातत्याने झुकणारे जनसामान्यांच्या हाकेला धावणारा अशी प्रतिमा असलेला कार्यकर्ता अमजद भाई असे समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते…असे म्हणतात कि कर्तृत्व निर्माण करण्यासाठी राजकीय बलाढ्य हस्तीचे वरद हस्त असावेच लागते. खर्‍या अर्थाने अमजद भाई यांना माजी आमदार प्रदीप नाईक आणि माजी बांधकाम सभापती,तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक दिनकर दहिफळे व माहूर चे नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी यांचे पाठबळ असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्रीच्या माध्यमातून वाई बाजार गावात मोठी कार्यकर्त्याची फौज निर्माण केली आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अमजद भाई चा आगामी वाई बाजार ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय होवो,सामान्य….अशा या नेतृत्वास वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा….

सुफियान अकबानी
वाई बाजार