माहूर:- तालुक्यातील हिंगणी – हडसनी – इवळेश्र्वर हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या रस्त्या वर चिखलाचे साम्राज्य झाल्याने सदर मार्ग चिखलात हरपला आहे.परिणामी वाट शोधतांना दुचाकी धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तालुक्यातील विदर्भाला जोडणारा प्रमुख अंतर्गत असलेला हिंगणी – हडसनी – इवळेश्र्वर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर थोडा जरी पाऊस झाला, तरी चिखलाचा राडारोडा होत आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या पुलावर गुत्तेदाराने माती टाकल्याने दीड किलोमीटर रस्त्यावर चिखल होत आहे. परिणामी रस्त्यावर वाहने अडकून पडत आहे तर दुचाकी स्लीप होऊन पडत आहेत.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर थोडा जरी पाऊस झाला,तरी चिखलाचा राडारोडा होत आहे.रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.या रस्त्याने साधे चालनेही कठीण होऊन गेलेले असून या साचलेल्या पाण्यामधून रस्ता शोधणे जिकरीचे झालेले आहे. रस्त्याची अशी अवस्था असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून शेतामध्ये बियाणे, खत नेणे, तसेच इतर कामासाठी शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
