भाजपा नेते आशिष शेलार यांनी घेतले श्री रेणुकामातेचे सपत्नीक दर्शन!

माहूर :-  भारतिय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी आज दिनांक 6 जूलै बुधवार रोजी माहूर गडावरील श्री रेणूकामातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
श्री रेणुका मातेला अभिषेक, पूजन भरजरी शालू, खण नारळाची ओटी भरुन विडा प्रसाद,पुरणपोळीचा महा  नैवेद्य अर्पण करुन महाआरती केली. यावेळी भाजपच्या सहकार्याने महाराष्ट्रात नव्याने स्थापन सरकारच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेला व विशेष म्हणजे बळीराजाला सूख,सम्रुध्दी प्राप्त व्हावी यासाठी श्री रेणूकामातेला त्यांनी साकडे घातले यावेळी संस्थानतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,संजय कान्नव यांच्या हस्ते आशिष शेलार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य वे. शा.संपन्न रविंद्र कान्नव यांनी केले. तद्नंतर त्यांनी दत्तशिखराचे दर्शन घेऊन महंत प. पू. मधुसूदन जी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भारतिय जनता पक्षातर्फे,अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा प.पू.योगी शामबापू भारती महाराज,भाजपा नेते धरमसिंग राठोड, नगरसेवक गोपू महामूने यांचेसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .