बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्यात बैठक! शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत ईद साजरी करावी :- नामदेव रिठ्ठे

माहूर:- मागील दोन वर्षे कोरोना काळात शहरातील मुस्लीम समाजाने प्रशासनास खुप सहकार्य केले आहे, तसेच येणाऱ्या बकरी ईद सणामध्ये देखील अशाच प्रकारचे सहकार्य करावे.सर्वानी बकरी ईद सण आनंदाने व शांततेत साजरा करावा. शासन निर्णयाप्रमाणे कुर्बानी करण्याचे आदेश असल्याने या आदेशाचे कठोर पणे पालन करावे असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी केले.
बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजातील नागरिकांच्या उपस्थिती मध्ये दिनांक ६ बुधवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे यांनी
शासनाने मान्य केलेल्या गुरांची कुर्बानी द्यावी,तसेच गो वंश हत्या उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत ईद साजरी करावी.कुर्बानी देतांना स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी तर आभार सपोनी संजय पवार यांनी केले.या वेळी गौसीया मस्जिद चे सदर जमीर मलणस, ताणू शा भानू शा मस्जिद चे इरफान कालूत,नगिना मस्जिद चे नुर महमद खा, जामा मस्जिद चे अहमद शे नबी,शेख फय्याज शेख जलाल, सय्यद इरफान सय्यद उस्मान,शेख निसार शेख मस्तान,सय्यद अजीम अलाउद्दीन, माजी नगरसेवक इलियास बावानी, सरफराज दोसानी यांच्या सह जमादार आडे,बाबू जाधव यांची उपस्थिती होती.