शेतातील झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्याला लाच मागणारा वन सर्वेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात! माहूर तालुक्यातील वानोळा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून यशस्वी सापळा!

माहूर:- शेतातील सागीची झाडे तोडण्यासाठी सर्वे करून परवानगी देण्याकरीता आणि झाडे तोड केल्यानंतर इतर आवश्यक परवानगी देण्यासाठी माहूर तालुक्यातील वानोळा येथील शेतकऱ्याला लाच मागणारा नांदेड येथील उप वनसंरक्षण अधिकारी कार्यालयातील वन सर्वेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.गणेश प्रकाशराव मज्जनवार, (वय 35) असे असे लाचखोर वन सर्वेक्षकाचे 
नाव असून तेरा हजारांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत विभागा कडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले आहे.
वानोळा येथील तक्रारदार शेतकऱ्याचा आई,भाऊ व मित्राचे शेतामध्ये शेत सर्वे नंबर 34,35,36,37,मध्ये मालकी पट्टा आहे.यातील सागाची झाडे तोडण्यासाठी सर्वे करून परवानगी देण्याकरीता आणि झाडे तोड केल्यानंतर इतर आवश्यक परवानगी देण्यासाठी 10 हजार लाचेची मागणी करून त्यातील 5 हजार रुपये यापूर्वी मज्जनवार यांनी स्वीकारले आहेत. उर्वरित 5 हजार रुपया मध्ये तडजोड करण्यासाठी तक्रारदार वन सर्वेक्षका कडे गेले असता त्यांनी वाहतुक परवाना देण्याचे काम वाढले असल्याचे कारण सांगुन अजून 13 हजार रुपये लाचेची मागणी करून ती आज दिनांक 6 रोजी स्वतः स्विकारली या वेळी नांदेड लाच लुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बातमी लीहे पर्यंत सुरू होतो.ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड परिक्षेत्राचे अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जमीर नाईक,पोलीस उप अधीक्षक  अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक,अरविंद हिंगोले, सापळा कारवाई पथक पोना एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, गणेश तालकोकुलवार, ईश्वर जाधव, चापोना मारोती सोनटक्के, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, जमीर नाईक यांनी केली.या कार्यवाही ने माहूर तालुक्यातील शासकीय कार्यालय व यातील वर कमाई शोधणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.