‘मी पुन्हा येईन, हे खरे झालेले नाही:-शरद पवार

मुंबई:- देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारलेले नाही. फडणवीसांचा चेहराच सर्वकाही सांगत होता, रा. स्व. संघाच्या संस्कारामुळेच त्यांनी ही जबाबदारी स्विकारली असावी. ‘मी पुन्हा येईन, हे खरे झालेले नाही, अशी टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

 

या घडामोडींबद्दल बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, की उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र यांनी फार आनंदाने स्वीकारली नाही. त्यांचा चेहराच सांगत होता. पण एकदा मुख्यमंत्रिपदावर गेल्यानंतर इतर पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात होती. शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि नंतर ते मंत्री होते.शरद पवार यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदनही केलं.