माहूर:- अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असलेले जांभळं सध्या सर्वत्र विकायला आली आहेत. वर्षातून केवळ पावसाळ्यात मिळणाऱ्या जांभळांना माहूर च्या बाजारपेठेत मोठी मागणी वाढली आहे. जांभळं चवीसोबत गुणवर्धक असल्याने त्यांची सोमवार च्या आठवडी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून आले.


जांभूळ हे विशेषतः गोड तुरट चवीचे असतात. जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे. जांभूळ रसाच्या तसेच बिया भुकटीला औषधी गुणधर्म आहेत. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरचे मुरूम व फुटकुळ्या जांभळाच्या बिया उगाळून लेप लावल्यास नष्ट होतात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. रामायण व पौराणिक ग्रंथांमध्ये जांभळाचे महत्त्व विशद केले आहे. एकूणच जांभूळ हे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.
