विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास ठेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे ; संतोष शेटकर

माहूर:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षणाला नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे.जागतिक बदलांना अनुसरून शैक्षणिक विचार, अध्यापन उपक्रम आणि वर्ग प्रक्रीयांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.माहूर तालुक्यातील जिल्हा परिषेद शाळांची प्रगती बऱ्यापैकी आहे,त्यात अजून सुधारणा करण्याची गरज आहे.विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास ठेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे असे मत गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील ११ केंद्रावर आज दिनांक २७ रोजी सुरू असलेल्या शिक्षण परिषदेला भेट देताना वाई बाजार व वडसा शाळेतील कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोना विषाणूमुळे गेली २ वर्षे  ऑनलाईन वर्ग सुरू होते ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला,काही महत्त्वाचे विषयही गमावले असल्याची तक्रार अनेक शिक्षक व पालकांनी केली होती.त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्गाच्या महत्त्वाच्या विषयांची उजळणी घेण्याची तयारी केली आहे.तर राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांची संदर्भात विद्यार्थ्याची प्रगती समजून घेणे तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील अडथळे दूर करणे,शिक्षक प्रशिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणीसाठी भारत सरकार शिक्षण मंत्रालय ,बोर्ड यांच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी (न्यास) चे आयोजन,या विषयाचीनप्रभावी अंबलबाजवणी करण्यात यावी,अशा सूचना पण गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी केल्या.या वेळी आष्टा शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील खांडेकर तर वाई बाजार शाळेत बी.डी.इश्र्वरकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.या वेळी केंद्र प्रमुख पोलाजी कानोळे, विठ्ठल आचने व केंद्रातील अंतर्गत मुख्याध्यापक शिक्षकांची उपस्थिती होती.