माहूर तालुका मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न! तालुक्यातील ५५ अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे होणार वाटप!

माहूर:- अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ शाखा माहूर ची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक २६ रोजी दुपारी २ वाजता स्थानिक विश्राम गृहात संघटनेचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन ठराव पास करण्यात आले.गत वर्षी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ माहूर  शाखेच्या वतीने कोविड मुळे अनाथ झालेल्या मुलांना शालेय साहित्य, स्कूल बॅग,खाऊ चे वाटप करण्यात आले होते. यावर्षी ही अनाथाच्या नाथ या कार्यक्रमांतर्गत तालुक्‍यातील ५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप १५ ऑगस्ट पूर्वी केले जाणार आहे. तालुक्‍यातील ६४ अनाथ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, यापैकी काही मुलांचे आई-वडील नाहीत,काहींना आई तर काहींना वडील नाही. अशा विद्यार्थ्यांना पत्रकार संघटनेतर्फे शालेय साहित्य वाटप करण्याचे गतवर्षीप्रमाणे चे नियोजन करण्यात आले आहे.या शिवाय पत्रकाराच्या हिताच्या व ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या काही अडचणीच्या विषयावर या वेळी साधक बाधक चर्चा झाली.
पत्रकार साजिद खान, कैलास बेहेरे,गजानन भारती सर कुटतीकर,जयकुमार अडकिने,अमजद पठाण यांनी ग्रामीण भागातील पत्रकाराच्या अडचणी विषद केल्या.या वर संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी यानी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल अशी हमी दिली. संघटनेचे सचिव राजकुमार पडलवार ,यांनी प्रास्ताविक तर आभार कैलास बेहेरे यांनी मानले.बैठकी च्या सुरवातीला पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल गजानन भारती,कैलास बेहेरे,साजिद खान यांना मिळालेल्या पारितोषिक बद्दल अभिनंदनाचा ठराव घेत त्यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.या वेळी ज्येष्ठ पत्रकार पुंडलिक पारटकर, प्रा.प्रवीण बिरादार,अड नितेश बनसोडे,  राज ठाकुर,दत्तात्रय शेरेकर,बाबाराव कंधारे,अर्जुन जाधव,विकास कपाटे,सूरज खोडके, रजकिरण देशमुख, गजानन कुलकर्णी,डॉ.जय प्रकाश द्रोनावार,शेख जावेद,यांची उपस्थिती होती.