जयंती विशेष लेख
१८९३ साली मुंबईत पहिली हिंदू – मुस्लिम दंगल झाली.या दंगलीचा फायदा घेत बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवात मुस्लिमा विरूद्ध विष ओकले.आणी मुंबई नंतर पुण्याण ही दंगल घडली.
हिंदू मुस्लिम समाजात फुट पाडण्यात टिळक यशस्वि झाले.त्याच वर्षी १८९४ साली पुण्यात सार्वजनिक सभेत राजर्षि शाहू महाराज यांच्या सत्कार करण्यात आला होता.या सत्कार समारंभात आपल्या भाषणात शाहू महाराजांनी पुण्यात घडलेल्या हिंदू मुस्लिम द़गलीचा उल्लेख करत सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांना हिंदू मुस्लिम समाजात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून समाजात शांती स्थापन करण्याचे आवाहन केले.ही गोष्ट आज इ.स. २०२२ मध्ये आपल्याला सामान्य वाटत असली तरी १८९४ साली यूवा असलेले छत्रपती शाहू महाराजांनी १२८ वर्षे आदी दंगलीचे राजकारण आती त्याचे समाज आणी देशावर होणारे दुष्परिणाम आपल्या दुरदृष्टीने ओळखले होते.ब्राम्हणवाद बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी आता दंगलीचा वापर करणार ही गोष्ट शाहू महाराजांच्या लक्षात आली होती.शाहू महाराज संपूर्ण आयूष्य हेच प्रयत्न करित राहीले कि ब्राम्हणवादाच्या षडयंत्राला बळी पडून हिंदू – मुस्लिम समाजाने आपसात भांडू नये .सामाजिक एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता सशक्त करण्यासाठी हिंदू मुस्लिम समाजात एकता असने अवश्यक असल्याचे शाहू महाराज सातत्याने सांगत.१९२० साली केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणतात,हिंदू आणी मुस्लिम एकाच राष्ट्राचे भिन्न-भिन्न अंग आहेत.आज संपूर्ण भारत सांप्रदायिकतेच्या ज्वालात पोळत आहे..जातिय गृहयुद्ध उद्भवल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
प्राण्याच्या तुलनेत आदिवासी,दलीत,मागासवर्ग,, अल्पसंख्याक यांच्या जिवनाचे काही मुल्य उरले नाही.प्रत्येकजन दुखी आहे,व्यथित आहे.दंगलीत होणाऱ्या बलात्काराच्या घटना,हत्या,अनाथ होणारी लहान मुले ,विधवा होणाऱ्या आमच्या बघिनी,निराधार होणारे वृध्द आई वडील,जाळून राख होणाऱ्या गरिबांच्या वस्त्या आणि बेचिराग होणारी गावे पाहून पश्चाताप करून काय फायदा ?दंगली होऊं नयेत,अशी भयावह स्थिती निर्माणच होवू नये यासाठी सामूहिक स्तरावर आज पर्यंत काही प्रयत्न झालेत का?अगदीच नाही …परंतू याच सांप्रदायिक संकटाला शाहू महाराजांनी १२७ वर्ष आधी जाणले होते.आणी सांगितले होते कि तुम्हीं हिंदू मुस्लिम एकता अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयास करावे..त्या काळात ब्राम्हण आणि प्रभू या जातींना सोडून सर्व मराठा, लिंगायत, जैन, मुस्लिम, समाज, मागासलेला होता.याचे मुख्य कारण शिक्षणाचा अभाव होते.१९०१ साली शाहू महाराजांनी मराठा आणी जैन बोर्डिंगची स्थापना केली .मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाहू महाराजांनी शिक्षणाबद्दल समाजात रूचि निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आणी त्यासाठी अवश्यक मदत करण्याचे आश्वासन ही दिले.परंतू कोणीही समोर आले नाही तरी सुद्धा शाहू महाराज थांबले नाही.त्यांनी दहा गरजू गुणवंत मुस्लिम विद्यार्थ्यांना व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देवून आपल्या संस्थानात मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरवात केली.या १० विद्यार्थ्यात १ विद्यार्थि कर्नाटक मेथिल अथनि गावचा शेख मुहम्मद यूसुफ अब्दुल्ला होता.नंतर मुहम्मद यूसुफ अब्दुल्ला राजाराम कॉलेज मधून ग्रज्युएट झाल्यावर शाहू महाराजांनी त्यास आपल्या संस्थानात मामलेदार या पदावर नियूक्त केले.आजच्या मुस्लिम समाजाने विचार करायला हवा १२७ वर्ष आधी तुमच्या शिक्षणासाठी चिंतित होणारे,आपल्या पैश्याने शैक्षणिक संस्था निर्माण करून शिक्षणाची व्यवस्था करणारे व नंतर आपल्याच संस्थानात मामलेदार या पदावर नोकरी देणारे नेक दिल नेता राजर्षि शाहू महाराज मुस्लिम समाजा बद्दल किती सहानूभूति ठेवत होते.आज जर मुस्लिम नत्यांच्या कामांचे विवरण बघीतले तर ,कब्रस्तानची बाउंड्री वॉल ,मुशायरेचे नियोजन,कव्वाली कार्यक्रम,क्रिकेटचे सामने,फूटबॉल चे सामने,सध्या स्थितीत तुम्हीं एक नेता असा दाखवा जो मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,अर्थिक विकासासाठी चिंता करीत असेल?आजचे नेते मुस्लिमांना बेरोजगारीने मारून ,मेल्यानंतर कब्रस्तानची बाउंड्री वॉल बांधून मेल्या नंतर सुरक्षेची व्यवस्था करत आहेत.अश्चर्याची बाब ही आहे कि” इकरा बिस्मि रब्बि कल्लज्जी खल्क”(शिका आपल्या पालन कर्त्याच्या नावाने )वाला समाज आज सुद्धा शिक्षणाला महत्त्व देत नाही.१९०६ साली शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांची सभा घेतली आणी मोहोमेडियन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली.याच्या अंतर्गत मुस्लिम बोर्डिंग सुरू करण्यात आली.विशेष म्हणजे शाहू महाराज स्वत: मुस्लिम बोर्डिंग चे अध्यक्ष झाले होते.जे इतर मराठा, जैन, लिंगायत,बोर्डिगचे अध्यक्ष झाले नव्हते.आणी यूसूफ अब्दुल्ला ला कार्यवाहक केले होते.मुस्लिम बोर्डिंग साठी शाहू महाराजांनी २५००० स्केअर फुट जागा दिली,त्यावर इमारत बांधकाम करण्यासाठी ५५०० रु देणगी दिली,संस्थानाच्या जंगलातून सागवानाचे लाकूड (११६ वर्षे आधी) आणी पाहता पाहता तेथे दोन मजली इमारत उभी राहीली.त्यास वार्षिक २५० रू अनुदान घोषित केले.मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासाठी शाहू महाराजांनी दिलेल्या योगदानास मुस्लिम समाज कधीही विसरू शकत नाही.त्यांनी संस्थानातील मुस्लिम धार्मिक स्थळाचे /दर्गाहचे उत्पन्न सुद्धा मुस्लिम बोर्डिंगाला देण्याचे आदेश दिले.राजर्षि शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाला आरक्षण लागू केले तेव्हा अनूसूचि १५५ वर मागासलेले मुस्लिम अशी नोंद करून मराठी मुस्लिम समाजाला आरक्षण देवून सहभागिता व प्रतिनिधित्वाचा अधिकार दिला होता .परंतू आज दुर्देवाने मराठी मुस्लिम समाजाला शाहू महाराजांनी दिलेल्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहेत.राजर्षि शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी मुस्लिम बोर्डिंग ची स्थापना केली.शाहू महाराजांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक मागासलेपणाची थट्टा नाही केली तर कठिन परिस्थिति असताना त्या काळी महात्मा फुले व सावित्री मटा फुले यांना मदत करणाऱ्या गफ्फार मुन्शी बेग,उस्मान शेख ,फतेमा शेख यांना आपल्या कार्यातून जिवंत ठेवले.मराठी मुस्लिमांना कुराणाचे अर्थ कळावे म्हणून जगात सर्वात आधी स्वताचे २५००० रू खर्च करून कुराणाचे मराठीत(देवनागरी लिपित) भाषांतर करण्यासाठी स्वताचे त्या काळातील२५००० रू म्हणजे आजचे २५०० कोटी खर्च करणारे शाहू महाराज आहेत .मुघलांनी ३५० वर्ष राज्य केले परंतू कुराणाचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला नाही हे विशेष .शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपूरी मस्जिद बांधण्यासाठी जागा दिली आहे.म्हणजेच मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक गरजा सोबतच धार्मिक आणी अध्यात्मिक गरजा जातीने लक्ष घालून पुर्ण करणारे खरे धर्मनिरपेक्ष, मानवतावादी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक कल्याणाचा वारसा जपणारे राजे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्यांच्या लोक कल्याणकारी आणी सामाजिक न्यायाच्या कार्याला आदराचा सलाम…
शेख सुभान अली
अध्यक्ष
दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान