माहूर:- शिवसेनेतील बंडखोर आमदार हे गुवाहटीमध्ये असले तरी आपल्या मतदार संघामध्ये काय सुरु आहे याची उत्सुकता त्यांना आहेच. हे सांगायचे कारण की गुवाहटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असतानाही सांगोला मतदार संघात काय सुरुयं हे जाणून घेण्यासाठी आ.शहाजी बापू पाटलांनी आपल्या कार्यकर्त्याला फोन लावला आणि त्याचीच ऑडिओ क्लिप सध्या राज्यभर व्हायरल होतेय.त्या तील ‘ काय झाडी काय बर्फाचे डोंगर काय हाटील काय जेवण ओकेच हाय समद’ हे आमदारांचे संवाद सध्या प्रचंड वायरल होत आहे,जो कोणी आप आपले निसर्गरम्य परिसरातील फोटो फेसबुक इंस्टाग्राम या समाज माध्यमावर टाकून आमदारांना ट्रोल केले जात आहे.
सोशल मीडियावर व्यक्त होणं, आपले विचार मांडणं, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण हे सर्व अगदी सोप्प आहे.पण सेलिब्रिटी – राजकीय नेते यांची एखादी वादग्रस्त पोस्ट किंवा क्लिप वायरल झाली की समाज माध्यमावर वादंग उठते.सध्या प्रचंड ट्रेण्ड होत आहे ते गोवाहाटी मधील शिवसेनेचे बंडखोर आमदार राहत असलेल्या रेडिसन ब्ल्यू हॉटेल मधील संभाषण….
##काय झाडी काय डोंगार….
आ.शहाजीबापू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संभाषणात सुरुवातीलाच त्यांनी गुवाहाटीतील स्थिती सांगितलेली आहे.नेते नमस्कार ,कार्यकर्ता- नमस्कार नमस्कार
कार्यकर्ता- कुठे आहेत नेते तीन दिवस झालेय फोन लावतोय
शहाजीबापू – आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे.
कार्यकर्ता- बरं
शहाजीबापू- काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्के मध्ये आहे.
कार्यकर्ता इथं टिव्हीवर आम्ही बघतोय, तुमचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. एवढा सारा घटनाक्रम तुम्ही बोलायचं तर. थोडी तरी सांगायचं तर
शहाजीबापू – नाय नाय नाय… हॅलो.. नेत्यांचा आदेश होता. कुणाला फोन करू नका. पण आता इतकं काही झाल्यावर मलाही करमना. मी म्हणलो. तालुक्यात कुणाला तरी बोलू. काय चाललंय काय नाय. बरं तालुका कसा आहे
कार्यकर्ता – इथं सर्व ओके आहे. सर्वानी तुम्ही घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी काल पुण्याहून आलो. कार्यालयावर गर्दी होती. सर्वांना वाटतंय बांपूंना संधी मिळतेय.

