माहूर तालुक्यातील शाळेत साजरा होणार जागतिक योग दिन! गट शिक्षण अधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना पत्र!

माहूर:- उद्या दिनांक २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या बाबत तालुक्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन शाळेतील मुख्याध्यापकाना गट शिक्षण अधिकाऱ्यांने पत्र दिले आहे.त्या नुसार जागतिक योगदिनाचे औचित्य साधून शाळेत योग शिबिराचे आयोजन, प्रभात फेरी,प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिके केली जाणार आहे अशी माहिती गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी दिली आहे.
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करावयाचा असल्याने या दिवशी सकाळी ६ वाजता  प्रभातफेरीचे आयोजन करावे.सदर प्रभातफेरीत ग्रामस्थ, योगविषयक काम करणाऱ्या व्यक्ती/संस्था तसेच विदयार्थी सहभागी होतील. प्रभातफेरी झाल्यांनतर तालुक्यातील सर्व शाळांमधुन एकाच वेळी म्हणजेच सकाळी  ७ ते ७.४५ या कालावधीत प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे असे निर्देश गट शिक्षण अधिकारी यांनी  दिले असून सर्व कार्यवाही करत असताना त्या बाबतीची छायाचित्रे कार्यालयाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर तसेच इतर समाज माध्यमांवर प्रसारित करावीत, तसेच या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर गावातील नागरिक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.असे ही पत्रात नमूद करण्यात आले आहे.