माहूर:- अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. अश्यातच आता युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा झाल्याने मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात ही याची धग जाणवू लागली आहे. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘ मोदी सरकार युवक बेरोजगार ‘ अग्निपथ योजना फसवी योजना अशा प्रचंड घोषणा देण्यात येऊन केंद्र सरकार च्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

“ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी 20 जूनला राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.त्या पार्श्भूमीवर माहूर येथील बस स्थानकाच्या समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात माहूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष मारोती रेकुलवार व युवक शहराध्यक्ष अमित येवतिकर यांच्या नेतृत्वाखाली सैनिक होऊ पाहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात अग्निपथ घेऊन येणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शेकडो तरुणांनी एकत्र येऊन अग्निपथ योजनेच्या विरोधात फसवी अग्निपत योजना रद्द करा व मोदी सरकार युवक बेरोजगार या घोषणा देऊण केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी तालुकाध्यक्ष अध्यक्ष मेघराज जाधव, नगराध्यक्ष फिरोजभैया दोसाणी, सरचिटनिस मनोजभाऊ किर्तने, भगवानराव जोगदंड सर, युवक जिल्हा चिटनिस रफिक सौदागर, युवक जिल्हा संघटक इरफान शेख, अनिल पाटिल हडसणीकर, रमेश पवार,नगर सेवक प्रतिनिधी अफसर आली, सुमित खडसे, युवक चे तालुका उपाध्यक्ष अभिजित राठोड,युवक शहर उपाध्यक्ष ओम पाटिल राऊत, विद्यार्थी शहराध्यक्ष रुषी खंदारे, युवक सदस्य फैजुला पठाण, रियाजभाई,विकास राठोड, जिवण राठोड, हडसणीचे उपसरपंच तय्यबअली व असंख्य युवक सदस्य उपस्थित होते.यावेळी आंदोलनास युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
