दुचाकी ला ट्रॅक्टर ने उडविले एक ठार एक जखमी!

माहूर:- तालुक्यातील गोंडवडसा नजीक  ट्रॅक्टरने एका दुचाकी ला दिलेल्या जोरदार धडके ने भिषण अपघातात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याचावर यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात करण्यात येत आहे.
काल दि. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गोंडवडसा फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या गोंडवाडी फाट्यानजीक माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील गणेश भिमराव कुसराम वय ४२ वर्षे व राजकुमार शंकर शेंडे वय २४ वर्षे हे दोघेही सारखणी येथील कापडदुकानावरील काम निपटून घरी अंजनखेड कडे येत असताना  त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टर ने जोरदार धडक दिली.यात गणेश भिमराव कुसराम वय ४२ रा. अंजनखेड ता. माहूर याचा जागीच मृत्यू झाला. तर राजकुमार शंकर शेंडे यास गंभीर अवस्थेत वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी जय हुलसुरे व डॉ. वैभव लहाने यांनी प्रथमोपचार करून प्रकृती गंभीर असल्याने राजकुमार यास माहूरकडे रवाना केले. दरम्यान माहूर येथून उपचार करून त्यास यवतमाळ च्या शासकीय रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह पो. कॉ. संजय शेंडे, संघरत्न सोनसळे, मोकले आदीनी घटनास्थळाकडे धाव घेवून मृतास शवविच्छेदनासाठी वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.ट्रॅक्टर चालक माधव देवकर याचेवर सिंदखेड पोलिसांनी ३०४(अ),२७९ व ३३८ नुसार गुन्हा दाखल केला असून पी. एस. आय. भोपाळे हे पुढील तपास करीत आहेत.
मयत गणेश कुशराम
 मयत गणेश कुशराम 

१०८ रुग्णवाहिका धावते डॉक्टर विना –

माहूर येथील १०८ ही रुग्ण वाहिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते,आज दुचाकीस्वार जखमीला यवतमाळ रेफर करतांना पुन्हा एकदा १०८ चा डॉक्टर गैरहजर असल्याचा अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.गंभीर रुग्णाला माहूर येथील ग्रामीण रुग्णालयातून ड्रायवर ने यवतमाळ ला नेले.