अलियान बेग खलील बेग याचे घवघवीत यश!

माहूर:- इयत्ता 10 वी चा ऑनलाईन निकाल दिनांक 17/06/2022 रोजी जाहीर करण्यात आला, त्या मध्ये अलियान बेग खलील बेग याने घवघवीत यश संपादन केले आहे.माहूर येथील प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका शकीला बी शब्बीर यांचा नातू अलियान बेग याने आर्वी येथील कृषक इंग्लिश विद्यालय येथून इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 97.80 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
अलियान बेग खलील बेग यांने नेत्रदीपक यश संपादन केल्याने  काल दिनांक 18 रोजी माहूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या मराठवाडा अध्यक्षा वैशाली ताई मोटे यांनी अलीयान चा सत्कार केला.या वेळी महिला विंग च्या नांदेड जिल्हा अध्यक्षा इंजि. प्रांजली रावणगावकर,नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,माहूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मेघराज जाधव नगराध्यक्ष,मा.जिप. उपाध्यक्ष समाधान जाधव,युवक तालुका अध्यक्ष मारोती रेकुलवार कृ.उ.बा.समिती दत्तराव मोहीते, माजी जीप सदस्या कलावतीताई बंडु भुसारे, माजी नगराध्यक्षा शितल ताई जाधव,नगरसेविका शकीला बी सय्यद, माजी नगराध्यक्षा, गौतमी कांबळे,नगरसेविका मसरत फातीमा रफिक सौदागर, विजया मुळे, शिवरामवार ताई, आशाताई राठोड,राखी देशमुख,कुसुम देशमुख,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा नम्रता कितने, बंडु पाटिल भुसारे,सरचिटनिस मनोजभाऊ किर्तने,भगवानराव जोगदंड सर, हाजी उस्मान खाँन चांदखाँन पठाण, नगरसेवक अशोक खडसे, रफिक सौदागर, अरविंद राठोड, विनोद राठोड, अनिल पाटिल हडसणीकर, ओम पाटील,शहराध्यक्ष अमित येवतिकर यांची उपस्थिती होती.