माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांना मुदतवाढ ; सहकार व पनण मंत्री यांचे सभापती ने मानले आभार!

माहूर:- कृषि उत्पन्न बाजार समिती माहूर या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास दि. १७.०१.२०२२ पासून एक वर्षाची मुदत संपेपर्यंत म्हणजेच दि. १६.०१.२०२३ पर्यंत किंवा निवडणुका होवून नवीन संचालक मंडळ प्रस्थापित होईल, या पैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत असल्याचे शासन परिपत्रक दिनांक १४ जून रोजी सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाणे निर्गमित केल्याने माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम,पूर्वोक्तानुसार सदस्यांची पदावधी समाप्त होण्यापूर्वी समितीच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणामुळे समितीच्या सदस्यांची सर्वसाधारण निवडणुका घेणे शक्य नसेल तर, राज्य शासनास शासकीय राजपत्रांतील आदेशाव्दारे वेळोवेळी कोणत्याही अशा समितीच्या पदावधी वाढवता येईल, मात्र अशा प्रकारे वाढविण्यात आलेला पदावधी एकदर कालावधी एक वर्षाहून अधिक असणार नाही, अशी तरतूद आहे.त्या नुसार एक वर्षा पर्यंत माहूर च्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालकांना मुदतवाढ देण्यात आली आहे.माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या शिफारशीने किनवट व माहुर दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समीतीस १ एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्या बद्दल मुंबई येथे सहकार व पनण मंत्री मा.ना. बाबासाहेब पाटील यांचे
 किनवट बाजार समीतीचे सभापती अनिल कर्‍हाळे पाटील,माहुर बाजार समीतीचे सभापती दत्तराव मोहिते व माहुर बाजार समीतीचे संचालक,सुजित बेहेरे पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे