माहूर:- मागील ५ वर्षांहून अधिक काळ प्रभारी वर असलेल्या माहूर तालुका पंचायत समितीतील गट शिक्षण अधिकारी पदाचा पदभार नूतन शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकर यांच्या कडे देण्यात आला आहे.जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिनांक १४ रोजी या संदर्भात आदेश निर्गमित केले आहे.

माहूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात मागील ५ वर्षापासून विस्तार अधिकाऱ्यावर शिक्षण विभागाची धिस्त आहे.त्यामुळे या पदाचा कार्यभार आलटून-पालटून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविला जातो.नुकतेच माहूर येथे विस्तार अधिकारी म्हणून रुजू झालेले संतोष शेटकर यांच्या कडे या पूर्वी कंधार आणि मुखेड तालुक्याचा गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार होता.त्या मुळे माहूर तालुक्यातील ढेपाळलेल्या शिक्षण विभागाला नव संजीवनी प्राप्त होणार असून यंत्रणेला अधिक गती मिळेल अशी आशा शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे.तर शिक्षकाच्या जिव्हाळ्याचा असलेला पगारीचा प्रश्न ही नूतन गट विकास अधिकारी यांना प्रामुख्याने सोडवावा लागणार असल्याने शिक्षकांना ही त्यांचा कडून अपेक्षा आहे.
