माहूर:- नव्यानेच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातिल शाळेची भिती दुर व्हावी व पालकांमधे शैक्षणिक जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक १५ शाळेच्या प्रथम दिनी प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. गट विकास अधिकारी एस.जी.कांबळे यांनी लांजी,शेकापुर,रुई या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

तालुक्यातील लांजी जिल्हा परिषद शाळेत इयता पहीली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परीसर स्वच्छ करून प्रांगणात आकर्षक रांगोळी, फुले व तोरण बांधुन शाळा सजविण्यात आली होती.सर्व शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येऊन गावातुन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी लांजी ला भेट देऊन समाधान व्यक्त केले.या वेळी मुख्याध्यापक अरविंद जाधव, रणधीर पतंगराव, राहुल कायटे, विष्णु राऊत, मिलिंद काळेवार, सुनिल अंबुलकर यांची उपस्थिती होती तर रुई येथील कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांचा सत्कार करून गणवेश व पाठ्य पुस्तके गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या वेळी मुख्याध्यापक समाधान कदम,एस.वी.केंद्रे,पी.एस.सराफ,
संतोष चव्हाण,वी.पी.कदम, ए.वी.बोंपिलवार ,योगेश हेलगंड,अशोक चव्हाण,यांची उपस्थिती होती.
