माहूर:- स्वागत – सत्कार साठी हार तुरे शाल व भेट वस्तूना फाटा देत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य हा उपक्रम माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी राबविला. त्यांनी केलेल्या आवाहनाला पंचायत समिती च्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने अजनी, भीमपूर, कोलमखेड,गोंडखेडी या दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांची बदली झाल्याने देण्यात येणाऱ्या निरोप समारंभ व त्यांचा वाढदिवस असा दुहेरी योग आल्याने त्यांनी तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी,केक मुक्त व सत्कार विरहित वाढदिवस साजरा व्हावा यासाठी त्यांनी मित्र परिवाराला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला.जमा झालेल्या साहित्यांचे आज दिनांक १५ रोजी शाळेच्या प्रथम दिनी अजनी, भीमपूर,कोलमखेड,गोंडखेडी येथील विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
