माहूर:- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज शनिवार सायंकाळपासून पावसाने माहूर शहरा सह तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांनाही मान्सूनची प्रतीक्षा होती.पावसाच्या आगमनामुळे आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांनाही पुन्हा सुरूवात होत आहे.

माहूर तालुक्यात प्रथमच आज दिनांक ११ रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान पावसाचे आगमन झाले.त्या मुळे भरुन आलेले आभाळ व पावसाच्या सरी यामुळे गेले काही दिवस उष्णतेने हैरान झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.तालुक्यात जवळपास सर्वच शेतकऱयांची मशागतीची कामे पावसाअभावी खोळंबली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाकडुन अगदी आतुरतेने पावसाची वाट पाहण्यात येत होते अखेरीस पावसाचे आगमन झाल्याने आता खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना शेतकरी पुन्हा सुरुवात होणार आहे.
