करंजी येथे शिष्यवृत्ती सराव वर्गाचे आयोजन! “संकल्प शिष्यवृत्तीचा ध्यास गुणवत्तेचा’ स्त्युत उपक्रम

  • माहूर:- माहुर तालुक्यातील करंजी येथे पूर्व प्राथमीक शिष्यवृत्ती परिक्षा पुर्वतयारी साठी करंजी सिंदखेड या केंद्रातील पाचवीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याना महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे मार्फेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना “यश मिळवण्यासाठी उन्हाळी सुटयात मे 15 जुन पर्यंत उन्हाळी सुट्ट्यात सराव वर्गाचे आयोजन केले आहे .स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व पूरक अध्ययन अध्यापन कार्य करण्याचा अभिनव उपक्रम विस्तार अधिकारी राजू मुधोळकर यांच्या मार्गदर्शन सुरू असल्याने, पालकांकडून कौतुकास्पद उद्गार काढले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने २ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुरेशी संधी उपलब्ध न झाल्याने, विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यक्रम व विविध उपक्रमाचे लक्ष्य गाठणे अवघड झाले होते.सदर वस्तूस्थिती शाळा प्रशासनाने लक्षात घेता, इयत्ता पाचवी चे शिष्यवृत्ती परीक्षाचे मार्गदर्शन व सराव वर्ग उन्हाळी सुट्टी असतांनाही नियमितपणे घेण्याचे ठरल्याने करंजी – सिंदखेड केंद्रातील पन्नास विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आले असुन विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा भिती दुर होण्यासाठी विद्यार्थ्याना गणित, भाषा, बुध्दीमत्ता चाचणी या विषयाचे तज्ञ विषय शिक्षकामार्फत सकाळी ९ ते १२ या वेळेत शिकवणी वर्ग घेण्यात येत आहे. गोरे गरीब तांडयावर वस्तीतील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती सराव वर्गाचा निश्चीतच लाभ होणार आहे.
जिल्हात बहुधा उन्हाळी सुट्ट्यात सराव वर्गाचे  नियोजन फक्त करंजी येथील शाळेत दिसून आले .विस्तार अधिकारी राजू मुधोळकर यांनी या पूर्वी असे उपक्रम भोकर व उमरी तालुक्यात राबविले आहेत.या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे, उन्हाळी सराव वर्गासाठी मिलिंद कंधारे, जिचकार,प्रधान गंधे, चौधरी, राहुल वानखेडे,कुसुमवाड, वाघमारे,मुनेश्वर, शिरगुरवार, शेरे , मुसने,गोडे सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.तर गट विकास अधिकारी कांबळे,विस्तार अधिकारी शेटकार,केंद्र प्रमुख पोपुलवाड, गट समन्वयक संजय कांबळे, मु.आ.वांगे,पुरोगामी शिक्षक संघटनचे अध्यक्ष एस.एस.पाटील यांनी कौतूक केले आहे.