आष्टा येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिबीर; नागरिकांचा प्रतिसाद!

माहूर:- प्रत्येक दिवसाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकालाच शारीरिक आणि मानसिकरीत्या सक्षम असणे खूप गरजेचे असते. बदलत्या जीवन शैलीमुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप वाढत असल्याचे दिसुन येत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे योग व प्राणायाम नियमित करणे हाच आहे. त्यानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने तालुक्यातील आष्टा येथील शंकरराव चव्हाण विद्यालय सभागृह येथे ९ ते १३ जून दरम्यान योग व प्राणायाम शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विश्र्विख्यात सुदर्शन क्रिया, आसन- प्राणायम – ध्यान – व अमूल्य ज्ञान याबाबतची महत्वाची माहिती प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षक डॉ.राम कदम हे देत आहेत.समाजातील प्रत्येक व्यक्तीने आनंदी व समाधानी, निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन केले असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग समुह तर्फे सांगण्यात आले.