ग्रामीण भागातही ‘आयपीएल’चा ‘फंडा’, खेळाडूंच्या लिलावाने माहूर मध्ये एमपीएल स्पर्धांचे आयोजन

माहूर(सरफराज दोसानी):- ग्रामीण भागामध्ये नेत्यांच्या वाढदिवसा निमित्त किंवा उत्सव,यात्रा,जयंती,असे योग साधून दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धांचे यंदा मात्र नवीन स्वरूप पाहायला मिळाले. माहूर येथील बॉस मित्र मंडळ च्या क्रिकेट स्पर्धा आयोजकांनी यंदा आयपीएलचा ‘फंडा’ अमलात आणला. आयपीएलप्रमाणे संघाचा आणि ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचा पॉइंट प्रमाणे लिलाव करून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

माहूर शहरातील मातृतीर्थ रस्त्यावरील मैदानावर आज दिनांक ११ रोजी एम.पी.एल.स्पर्धेचे उद्घाटन माहूर नगरीचे उपनगराध्यक्ष नाना लाड यांच्या हस्ते तर सभापती अशोक खडसे,विजय कामटकर ,नगरसेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,रफिक सौदागर,इरफान शेख, अप्सर आली,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी,उद्योजक आशिष जैस्वाल यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाळ्यात ग्रामीण भागामध्ये कब्बडी,व्हॉलीबॉल,क्रिकेट सह विविध स्पर्धा खेळवण्यात येत आहेत. यात क्रिकेट च्या नव्या पद्धतीने आयोजित स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे.बॉस मित्र मंडळ व फैजुल्लाखान आयोजित माहूर प्रीमियर लीग स्पर्धेत ८ संघाचे १२० खेळाडू सहभागी झाले आहे .प्रत्येक संघमालकाला खेळाडू विकत घेण्यासाठी १ लक्ष पॉइंट देण्यात आले होते. यात यादी मधील एका संघासाठी १५ खेळाडू घेण्यात आले. अशा प्रकारे नव्या स्वरूपात ग्रामीण भागातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांत उत्साह संचारला आहे.