माहूर पोलिसांची अवैध दारू व जुगारावर कारवाई!

माहूर:- माहूर पोलिसांनी बेकायदेशीर गावठी दारू विक्रेत्यांसह वरली,मटक्याच्या धंद्यांवर कारवाई करताना दोन आरोपींवर आज दिनांक ४ रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
माहूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन माहूर अंतर्गत काही खेड्यांमध्ये छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री करण्यात येत होती. शिवाय माहूर  बस स्थानक परिसरात वरली, मटक्याचा अवैध व्यवसायही सुरू होता. या संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव रिठे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शना खाली जमादार विजय आडे,चालक पांडुरंग गुरणुले,मारोती चव्हाण,रामचंद्र इंगोले,यांच्या पथकाने माहूर बस स्थानक परिसरातील वरली, मटका, जुगारांवर धाड टाकून २ हजार १२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपी अशोक बरडे,रा.वार्ड क्रमांक ३ माहूर, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला ,तर दुसऱ्या कार्यवाहीत रूई गावातील उत्तम खंदारे याने विना परवाना,बेकायदेशीर गावठी हात भट्टी दारू ज्याची किंमत १ हजार ४८० मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.