माहूर मध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी!

माहूर:- राजपूत समाज संघटना आयोजित वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज दिनांक 2 रोजी महाराणा प्रताप चौक येथे आयोजित जयंती  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ प्रदीप नाईक हे होते,तर उप नगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे, विलास भंडारे, सागर महामुने, मेघराज जाधव, यश खराटे, प्रा.भगवान राव जोगदंड सर,निरधारी जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व सरफराज दोसाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वन करुन जयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. डॉ. निरंजन केशवे, यश खराटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी, अण्णासाहेब पवार व प्रदीप नाईक यांनी आपल्या मनोगतातून आपली वीरता, हुशारी आणि धाडसासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले आहे.राष्ट्रवीर राणा प्रतापसिंह यांची शौर्यगाथा समाजापुढे मांडण्याची व समाजाने त्याचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त केली. या सोहळ्याला डॉ. राम कदम, सुमेरसिंह ठाकूर, गुमानसिंह चुंगडे, लक्ष्मणसिंह चुंगडे, देविसिंह हजारी,ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे,अपील बेलखोडे, राम दातीर, गजानन कुळकर्णी, गणेश चव्हाण,महीला पत्रकार सुरेखा तळणकर,विजय अमाले, आदींची उपस्थिती होती. उत्सव समिती अध्यक्ष रणजितसिंह चूंगडे, कुंदनसिंह पवार,सुनीलसिंह चुंगडे, पवन चौहान, कमल धनावत, राज ठाकूर,सोनू ठाकूर, नयनसिंह राठोर,रितेश चंदेल,अजय दीक्षित,प्रीतम चुंगडे, आदींनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.सूत्रसंचलन एस.एस.पाटील सर यांनी केले.
दिल्लीकरांनी त्याकाळीही राणा प्रतापांना छळण्याचा प्रयत्न केला.मात्र शौर्याच्या जोरावर त्यांनी तो हाणून पाडला. प्रा.राजेंद्र केशवे
आत्ताचे दिल्ली सरकार ज्याप्रमाणे केंद्राच्या विविध यंत्रने मार्फत राज्य सरकारला छळत आहे. त्याच प्रमाणे त्याकाळीही दिल्लीच्या मोगलांनी राणा प्रतापसिंहांना छळण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्भुत शोर्याच्या जोरावर त्यांनी तो मोडीत काढला असे मत व्यक्त करून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजेंद्र केशवे यांनी केंद्र सरकारला चिमटा काढला.