माहूर मध्ये जीपचा १ गट व पस चे दोन गण वाढले; काहींची पिकली पोळी तर काहींच्या तोंडचे पळाले पाणी!

माहूर :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना आज दिनांक 2 जून 2022 रोजी माहूर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध करण्यात आली.
माहूर तालुक्यात पूर्वीच्या वानोळा व वाई गटात एकाने भर पडली असून नवीन प्रभाग रचनेत लखमापूर हा नवीन गट तर लखमापूर व हडसनी अशे दोन गण सुद्धा वाढले आहे.लखमापूर गणात लखमापुर,लखमापूर तांडा,आष्टा, शेकापूर,लांजी, लिंबायत,केरोळी,नेर,जग्गू नाईक तांडा, कसळसिंग तांडा,मालवाडामुरली, टाकळी,नखेगाव, पडसा,वडसा,उमरा या गावांचा समावेश आहे.तर हडसनी गणात रुई,शेख फरीद वझरा,अनमाळ दत्तमाजरी, अंजनी,अनमाळ, इवळेश्वर,हिंगणी,दिगडी कु, तांदळा,ममतापुर, गुंडवळ, गुंडवळ तांडा,या गावाचा समवेश आहे.वाई जीप गटात वाई व गोंडवडसा असे दोन गण असून वाई गणात वाई बाजार,वाई तांडा, मच्छिन्द्र पार्डी,दासू नाईक तांडा,बजारा तांडा,गोकुळनगर गोडेगाव,सावरखेड, बोडगव्हाण, हरडप, मदनापुर, करळगाव, सायफळ,कोळी, या गावांचा तर गोंडवडसा गणात गोडवडसा,रामु नाईक तांडा, रुपा नाईक तांडा (गोकुळनगर),करंजी, गंगाजीनगर, सेलु, लोकरवाडी, वायफणी,वसराम तांडा, सत्तीगुडा, गोंडखेडी, भगवती,सिंदखेड लिगमपेठ, अंजनखेड,मनिरामथड,नाईकवाडी,या गावाचा समावेश आहे. वानोळा जीप गटातील वानोळा गणात वानोळा तांडा, पाचुंदा,मेंडकी,मुंगशी, रामपुर, परसराम तांडा, बोरवाडी, भिमपुर, महादापुर,शिवूर,रायगड, कुपटी ,पानोळा, पवनाळा,दिगडी धा,धानोरा दी, साकुर,दहेगाव या गावांचा समावेश आहे.तर पापलवाडी गणात पापलवाडी,हीवळणी ,असोली, मेट, कासारपेठ, सळंबी,तुळशी, मलकागुडा ,मलकागुडा तांडा, चोरड, जुनापाणी,भोरड, लसनवाडी, रुपलानाईक तांडा, मांडवा,या गावांचा समावेश आहे.
काहींची पिकली पोळी तर काहींच्या तोंडचे पळाले पाणी!
पूर्वीच्या वाई गटातून काही गावे व वानोळा गटातील काही गावे मिळून नवीन लखमापूर जीप गट अस्तित्वात आला आहे.त्या मुळे इच्छुकांना आपल्या हक्काची गठ्ठा मते असलेली गावे इतर गटात व गणात समाविष्ट झाल्याने काहींची पिकली पोळी तर काहींच्या तोंडचे पळाले पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.