वानोळा येथे नविन पोलीस चौकी मंजूर करा: दत्तराव मोहिते यांचे गृह मंत्र्यांना निवेदन!

माहूर:- माहूर तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ भाग असलेल्या वानोळा परिसरात आदिवासी, बंजारा व आठरा पगड जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. या परिसरातील ३०-३५ गावातील जनतेला छोट्या-मोठ्या अडचणींसाठी माहूर पोलीस स्टेशनला जाण्यासाठी ५० ते ६० कि.मी.अंतर पार करून जावे लागते.
माहूर तालुक्यात माहूर व सिंदखेड असे दोन पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. माहूर पोलीस स्टेशनची व्याप्ती जादा असल्याने या भागाकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने या अविकसित भागात सध्या जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतुक,चोरीच्या घटना व मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. त्यामुळे वानोळा या सर्कलच्या गावात पोलीस चौकी मंजूर केल्यास तळागाळातील सर्व सामान्य जनतेला याचा फायदा होईल व बिनदिक्कतपणे चालू असलेल्या अवैध धंद्याला आळा बसेल.असे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते यांनी गृह राज्य मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोषिकर,नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगर सेवक यासीन ना यांची उपस्थिती होती