अनधिकृत बांधकाम धारकां वर फौजादरी गुन्हे दाखल करा; बांधकाम सभापतीची मागणी!

माहूर:- माहूर शहरात एकूण 27 अनधिकृत बांधकाम धारकाना नगर पंचायत कार्यालयामार्फत तत्कालीन मुख्याधिकरी काकासाहेब डोईफोडे,विद्या कदम, व प्रभारी मुख्याधिकारी राकेश गिद्दे यांच्या काळात नोटिसा देण्यात आल्या आहेत.गत मार्च महिन्यात अंतिम नोटीस सुद्धा देण्यात आली,मात्र अद्याप अनधिकृत बांधकाम धराकांवर कुठलीच कार्यवाही नगर पंचायत प्रशासनाने केली नाही.परिणामी अवैध बांधकामाचा सापटा शहरात सुरूच आहे.ज्या अनधिकृत बांधकाम धारकास नोटीस दिल्या आहेत त्यांच्या वर आपल्या स्तरावरून फौजादरी गुन्हे दाखल करा अशी मागणी माहूर नगर पंचायतीच्या बांधकाम सभापती बिलकिस बेगम अहमद आली यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
माहूर नगर पंचायत चा कारभार सध्या प्रभारी मुख्याधिकारी वर आहे.तहसीलदार किशोर यादव यांच्या कडे नगर पंचायत मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना तालुक्यातील महसूल सह इतर कामे व अधिक व्याप असल्याने न.प.प्रशासन उर्वरित वेळेवर तहसील कार्यालयातून सुरू आहे.अशात शहरात अनेक समस्या उद्भवल्या ने विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्त्यांचा तक्रारी निवेदनाचा खच पडला आहे.यातच नगर पंचायतीच्या बांधकाम सभापतीच्या पत्राची आता भर पडली असून अवैध बधकाम धारकाना नगर पंचायत प्रशासन नोटिसा देऊन मोकळे होत असल्याने त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी सभापती बिलकिस बेगम अहमद आली यांनी केली आहे,सोबतच न्यायालयीन कामासाठी अतिक्रमण धारकांना दिलेल्या नोटीस ची प्रत उपलब्ध करून द्यावी असे लेखी निवेदन ही त्यांनी दिल्याने नगर पंचायत प्रशासन बांधकाम सभापतीच्या निवेदनाला किती गांभीर्याने घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.