माहूर:- शहराच्या मुख्य बाजारपेठ व सार्वजनीक ठिकाणी असलेली चिकन सेंटर ची दुकाने शहरा बाहेर हलवावी व उघड्यावरील मास विक्री त्वरीत बंद करावी अन्यथा नगर पंचायत कार्यालयाततील मुख्याधिकारी यांच्या दालनात बोंबा मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक ३० रोजी मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या पूर्वी 14 डिसेंबर 2015 व 09 ऑक्टोंबर 2018 ला मनसे कडून उघड्यावरील मास विक्री बंद करण्या संबंधी निवेदन दिले होते, तर नुकतेच आबासाहेब पार्वेकर मार्केट मधिल व्यापाऱ्यांनी दि.28 एप्रिल 22 ला मुख्य बाजार पेठेतील चिकन विक्रीचे किरकोळ दुकान इतरत्र हलविण्यासाठी निवेदन दिले आहे.मात्र नगर पंचायत प्रशासन या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करीत आहे.माहुर शहराचे धार्मीक पवित्र्य लक्षात घेता व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथ रोगाची शक्यता नाकारता येत नसल्याने शहरातील देवदेवश्वर मंदिर व विश्राम गृहा कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आबासाहेब पावेंकर मार्केट या मुख्य बाजार पेठेतील गजानन लॉज शेजारी नागरीकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी कोंबड्याची कत्तल करून त्यांचे निरपयोगी भाग पंख जागो जागी फेकण्यात येत आहे.त्या वर आळा घालावा,या शिवाय तहसिल कार्यालयाकडे वळणाऱ्या रस्त्यावर माहुर किनवट राज्य मार्गावर, संतोष किराणा शेजारी, शिवाजी चौक च्या बाजुला होणारी कत्तल रक्ताचे थारोळे हा किसळखाना प्रकार देवभुमी असलेल्या माहुर शहरातील भावीक उघड्या डोळ्यांनी पाहतात हि बाब नक्कीच अशोभनीय आहे. या गंभीर प्रकरणी निवेदनाची दखल घेऊन त्वरीत हि दुकान शहरा बाहेर हलवावी.15 दिवसाच्या आत उघड्या वरील मासविक्री बंद झाली नाहीतर नगर पंचायत कार्यालयातील मुख्याधिकारी यांच्या दालनात मनसे चे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात बोंबा मारो अंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी,गणेश वर्मा, आशिष बारस्कर, मारुती गोपे,राम दातीर,निशांत पुरी, प्रकाश पळसकर,यांनी दिला आहे.
