शासनाच्या “त्या” निर्णयाने तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांची बल्ले बल्ले! जून नंतर बदल्या होणार असल्याने आनंदी आनंद….

माहूर:- शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पदानुसार व कार्यकालानुसार दर 3 वर्षांनी बदल्या होतात..दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची धांदल उडालेली असते. तथापि,२०२० व  २०२१ मध्ये कोरोनाचा कहर सुरु होता.त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या न करण्याचा आदेश दिला होता.त्या मुळे बदली पात्र अधिकारी कर्मचारी यांना जीवनदान मिळाले होते,त्याच राज्यात ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्या ने आणखी एक महिना लांबणीवर बदल्या गेल्या आहेत.एकी कडे या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना हव्या त्या ठिकाणी बदली साठी वाट बघावी लागणार असल्याने हिरमोड झाला असताना मात्र माहूर मध्ये जून नंतर बदल्या होणार असल्याने कर्मचाऱ्यांत आनंदी आनंद पसरले असून शासनाच्या “त्या” निर्णयाने तळ ठोकून बसलेल्या अधिकाऱ्यांची बल्ले बल्ले झाली आहे.
माहूर तालुक्यात तहसील कार्यालय, नगर पंचायत,कृषी विभाग,ग्रामीण रुग्णालय,या प्रमुख विभागात बदली संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देत मागील १० ते १५ वर्षापासून कर्मचारी एकच ठिकाणी ठाण मांडून बसले आहे.काही नी इतरत्र बदली झाल्यावर ही पुन्हा वासिले बाजीने माहूर ला आहे त्याच ठिकाणी पुन्हा नियुक्ती मिळविली तर काहींनी प्रतिनियुक्तीवर आपले पद माहूर लाच टिकवून ठेवले आहे.परिणामी त्या कर्मचाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेप वाढला असून वासिलेबाज कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांची हतबलता ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे.प्रशासकीय कामकाज अचूक आणि निर्दोष व्हावे, कोणतेही हितसंबंध जोपासले न जाता कोणावरही अन्याय होऊ नये,असे अपेक्षित असताना अतिदुर्गम माहूर तालुक्यात मात्र या परंपरेला उघड फाटा दिला जात आहे.आता बदली बाबत शासन निर्णय च झाल्याने एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना फावले आहे.त्यांचा जीव भांड्यात पडला असून माहूर चा मोह त्यांना इतरत्र बदली करण्यासाठी अडचणीचा ठरत आहे.
तहसील कार्यालय,नगर पंचायत,कृषी विभाग,पोलीस विभाग,ग्रामीण रुग्णालय या प्रमुख विभागात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून गेल्या १०-१५ वर्षापासून एकाच ठिकाणी कुंडली मारून काही वर्ग दोन व तीन चे कर्मचारी बसले आहे. याचा फटका सरळसरळ इतर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर जाणवत आहे.कर्मचाऱ्यांचे असो वा अधिकाऱ्यांचे, नियमित अंतराने स्थानांतरण केले जात नसेल तर त्यांचा कार्यात निरसता तर येतेच, पण नागरिकांशी हितसंबंध आल्याने एखाद्या प्रकरण्यात चुकीच्या पद्धतीने कामे होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय अधिक काळ एकाच पदावर वा एकाच ठिकाणी राहिल्यास आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याशिवाय इतर विभागातील कार्याचा अनुभव अशा कर्मचाऱ्यांना येत नाही.त्या मुळे धृतराष्ट्राच्या भूमिकेत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाणे अशा ठगाचा शोध घेऊन जून नंतर तरी त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी होत आहे.