हॉटेल च्या स्वच्छता गृहाचे सांडपाणी रस्त्यावर;बसस्टँड परिसरात दुर्गंधी! प्रवाशाचे आरोग्य धोक्यात!

माहूर:- शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या किनवट –  रोडवरील रस्त्यावर एका हॉटेल च्या स्वच्छता गृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
माहूर शहरातील “हार्ट” असलेल्या बस स्थानक समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात,नगर पंचायत ला लागून असलेल्या एका हॉटेल चे सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे.या रस्त्यावर शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. हा रस्ता गजबजलेला असून कायम वर्दळ असते. येथील नागरिक या दुर्गंधीला वैतागले आहेत . सध्या पावसाळा तोंडावर आल्याने मलेरीया , थंडीताप, डायरीया सारख्या साथीच्या रोगाची वाढ मोठ्याप्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही . मोटार सायकल वरुन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराना पण  पाण्यातून मार्ग काढत असताना स्वच्छता गृहाचे हे दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर येत आहे.
महामार्ग विभागाने मागील चार पाच महिन्या पूर्वी रस्ता खोदून ठेवल्याने अस्तिवात असलेली नाली नाहीशी झाली आहे. मात्र त्या ठिकाणी सांडपाणी ची व्यवस्था करणे गरजेचे असताना हॉटेल मालक रस्त्यावर पाणी सोडत आहे.याच पाण्यातून मार्ग काढत नगर पंचायत च्या प्रभारी मुख्याधिकारी सह अन्य कर्मचाऱ्यांच्या चार चाकी गाड्या भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून नगर पंचायत कार्यालय गाठत आहे.या वरून नगर पंचायत प्रशासनाचा निर्लज्ज कारभार लक्षात येऊ शकतो.तब्बल दोन ते तीन महिन्या पासूून थेट किनवट – माहूर महामार्गावरून वाहू लागल्या दुर्गंधी युक्त पाण्या बाबत  शहरातील एका ही सुज्ञ नागरिकांची,समाजसेवक म्हणून मिरवनाऱ्या तथकथित मंडळी ची, स्वच्छतेच्या गप्पा हाक नाऱ्या नगर पंचायती मधील लोकप्रतिनिधी ची,किंवा आरोग्य विभाची कुठली ही तक्रार नसल्याने “निर्लज्ज सदा सुखी” म्हणत नगर पंचायत चे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे हे कटू सत्य आहे. परिणामी प्रवाशी,नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तातडीने  दुर्गंधीयुक्त पाणी बंद करावे,अन्यथा जन आंदोलनाला नप प्रशासन पुढे जावे अशा संतप्त प्रतिक्रिया त्या भागातील व्यावसायिकांनी दिल्या आहे.