साथी चे आजार पसरणार नाही याची काळजी घ्या;- किर्ती किरण पुजार! सहाय्यक जिल्हाधिकारी यांची माहूर येथे सर्व विभागप्रमुखा सोबत मान्सूनपूर्व बैठक!

माहूर:- नदी काठातील गावात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व सुविधे सह सज्ज रहा, गट विकास अधिकाऱ्यानी ग्रामसेवकांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील गावात व मुख्याधिकारी यांनी माहूर शहरात पावसाळ्यात साथीचे आजार पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.अशा सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिल्या आहे.
काल दिनांक १९ गुरुवार रोजी माहूर तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीला तहसीलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या सह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थिती होतो.
सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या बैठकीत नागरिकांच्या आरोग्याचे हित जपत ग्रामीण भागातील ग्राम पंचायत तर माहूर शहरातील नगर पंचायतीला साथीचे आजार पसरू नये म्हणून नळ योजनेच्या पाण्यात व सार्वजनिक विहिरीत ब्लिचिंग पावडर चा वापर करणे व तुदुंबलेल्या नाल्या,गटारी साफ करणे या वर विशेष लक्ष देण्याचा सूचना केल्या.महावितरण विभागाला लोंबलेली तारे, नादुरुस्त रोहित्री यावर लक्ष केंद्रित करून पावसाळ्या पूर्वी कामे पूर्ण करण्याचे सांगितले.तर सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्या लगत ची अर्धवट तुटलेली व वाकलेली झाडे शोधून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही या साठी दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.अजून पावसाळ्याला १५ दिवस असून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला अधिकारी कर्मचारी किती गांभीर्याने घेतात हे येणाऱ्या काळात कळणार आहे.