आता सावध सावधान…. बनावट खत पकडले…. ! बोगस बियाणे बाजारात विक्री होणारच नाही याची दक्षता कृषी विभाग घेणार का….?

माहूर:- खरीप हंगाम सुरू झाला की, शेतकऱ्यांची जशी पेरणीची लगबग सुरू होते तशीच बोगस बियाणे विक्री करणारेही हातपाय पसरू लागतात.दोन दिवसा पूर्वीच कृषी विभागाच्या पथकाला एका खबऱ्याने रासायनिक खते कमी दरात विक्री करण्यात येत असल्याची माहिती दिल्यावरून खंबाळा येथे धाड टाकून एका ट्रक सहित बोगस खतावर माहूर उपविभागीय पोलिस ठाणे हद्दीतील मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मुळात ही कार्यवाही खबऱ्याच्या खबरी मुळे झाली असली तरी कृषी दुकानात व गावोगावी फिरून विक्री होत असलेल्या बोगस बी बियाणे बाजारात विक्री होणारच नाही याची दक्षता कृषी विभागाणे घेणे गरजेचे आहे.
गेल्या खरीप हंगामात अनेक बीज उत्पादक कंपन्यांनी बोगस बियाणे पुरवून बळीराजाच्या पाठीत खंजीर खुपसला होता.विमा कंपनी व कृषी विभागाने काखा वर केल्याने शेतकऱ्यांना विम्याची किवा शाशना कडून नुकसान भरपाईची फुटकी कवळी ही मिळाली नव्हती.कापूस हे नगदी पीक सुद्धा माहूरच्या कृषी खात्याने कुठलेही मार्ग दर्शन न केल्याने पहिल्याच वेच्यात बाद होऊन लाखोंचे कर्ज शेतकऱ्यांच्या माथी होतें.तर महिको या कंपनीचे प्रतिनिधी गावागावात जाऊन बाहुबली + (एम.आर.सी.७३७६ बिजी२) बियाणे, छापील किमतीपेक्षा कमी दमात घरपोच देत होते.याला शेतकरी बळी पडले विशेष म्हणजे बियाणे विक्री ची कुठलीही पावती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. काही ठिकाणी हे बियाणे उगवले नाही,मात्र पावती नसल्याने शेतकऱ्यांना कुठलीच तक्रार करता आली नाही.या गंभीर प्रकरणाला दैनिक पुण्यनगरी ने उचलून धरले होते, दिनांक ७ जून २०२१ रोजी या बाबत सुविस्तर वृत प्रकाशित करून वाचा फोडली नंतर कृषी अधिकाऱ्यांनी सदर कंपनीकडे नोटीस देऊन खुलासा मगविला होता.मात्र पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कार्यवाही चे धाडस दाखविले नव्हते.त्या मुळे कृषी विभागाचे कृषी दुकानदार व गावात फिरून बियाणे विक्री करणाऱ्या सोबत काही साटे लोटे तर नाही ना या शंकेला वाव आहे.त्या मुळे बोगस बियाण्यांच्या दृष्टचक्रातून शेतकरी बांधवांची सुटका कधी होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.