कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे:- कपिल नाईक माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न!

माहूर:- आगामी काळात होणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद बाजूला ठेऊन जोमाने कामाला लागावे,असे प्रतिपादन युवा नेते कपिल नाईक यांनी व्यक्त केले आहे.
आज दिनांक ९ सोमवार रोजी माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा किनवट – माहूर विधानसभा प्रभारी पुसद चे आमदार इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तर युवा नेते कपिल नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,किनवट चे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड माहूर चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती दत्तराव मोहिते, माजी जीप सदस्य मधुकर राठोड,विशाल जाधव,प्रवीण म्याकलवार,अनिल कऱ्हाळे,बंडू पाटील भुसारे, हाजी उस्मान खान चांद खान,बंडू नाईक, यांची प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्या समोर ठेऊन पक्ष संघटन वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थात आज सोमवार पासून माहूर गडावर श्री रेणुका मातेची आरती व महापूजा करून श्री गणेशा केला आहे. दर्शन व आरती नंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कपिल नाईक म्हणाले की,मागील २० वर्षापासून माजी आमदार प्रदीप नाईक जनतेच्या सेवेत आहे.१५ वर्ष त्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे.सत्ता असो किंवा नसो,नागरिकांचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी आज ही प्रदीप नाईक जनतेत कार्यरत आहे.राष्ट्रवादी पक्षाशी व प्रदीप नाईक यांच्या शी गद्दारी करणाऱ्यांची अवस्था विधानसभेतील नागरिकाच्या समोरच आहे.या पुढे ही पक्षात राहून पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांना माफी नाहीच,मी स्वतः आता या क्षणा पासून माझे संपूर्ण कारभार,व्यवसाय यांचा त्याग करून मतदार संघात जनतेच्या सेवे साठी अविरत राहणार असून विधान सभा क्षेत्रातील एकूण सध्या असलेल्या ८ किंवा संभाव्य १० गट व २० गणात शत प्रतिसाद राष्ट्रवादी या दिशेने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना देखील कपिल नाईक यांनी केल्या.तर अध्यक्षीय समारोपात आ.इंद्रनील नाईक यांनी किनवट – माहूर मतदार संघात वैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नव्या उमेदीने पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत,मतदार संघातील विकासाचा रथ पुढे न्यायचा असेल तर प्रदीप नाईक यांचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी मंचावरील मान्यवरानी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी कुंदन पाटील पवार, राहुल नाईक,अमित नाईक,अरविंद राठोड,अमजद पठाण,केजी राठोड,बळीराम राठोड, कुंदन राठोड,दिनेश पवार,गणपत आडे,गजानन मुंडे,सुनील आडे,कैलास बेहेरे,अनिल पाटील हडसनिकर,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते हजर होते. संचलन अर्जुन जाधव,यांनी प्रास्ताविक दत्तराव मोहिते यांनी तर आभार भगवान राव जोगदंड यांनी मानले.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ओम पाटील,राजू चव्हाण,प्रतीक कांबळे, सुनील आडे, आशू पठाण,इरफान सय्यद, अब्दुल रहमान शेख आली, स्वप्नील कांबळे, ऋषी खंदारे, लतिफ भाई, व अन्य कार्यकत्यांनी केले .