तलाठी चंद्रकांत बाबर यांनी पटकविले जलतरण व टेबल टेनिस स्पर्धेत पाच सवर्ण पदक! शुभेच्छांचा वर्षाव!

माहूर :- नांदेड येथे झालेल्या औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत तलाठी चंद्रकांत बाबर यांनी वैयक्तिक जलतरण स्पर्धेत ४ व टेबल टेनिस स्पर्धेत १ असे एकूण ५ सवर्ण पदक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात जलतरण रिले स्पर्धेत दोन सुवर्ण,टेबल टेनिस मध्ये दोन सुवर्ण,आणि बॅडमिंटन दुहेरी मध्ये १ सिल्वर पदक घेऊन एकूण आठ सुवर्ण व १ सिल्वर पदक  जिंकल्या बद्दल तलाठी बाबर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून माहूर नगरी च्या वतीने   नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष नाना लाड,नगर सेविका प्रतिनिधी निरधारी जाधव,रफिक सौदागर यांनी त्यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
४५ वर्षावरील व ४५ वर्षाखालील अशा दोन गटात प्रत्येकी ५० मीटर व १०० मीटर अंतरावरील पोहण्याच्या महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच नांदेड मध्ये संपन्न झाल्या.यात माहूर व किनवट येथे मागील दहा वर्षापासून सेवा देत असलेले तलाठी चंद्रकांत बाबर यांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले.जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी घेतलेल्या पुढाकारातून या स्पर्धा संपन्न झाल्यानेच मला माझ्या खेळाचे प्रदर्शन करता आले असे मत तलाठी बाबर यांनी व्यक्त करत महसूल विभाग नांदेडचे आभार मानले आहेत.