अग्निशमन दलाचे शार्तीचे प्रयत्न आणि मोठी दुर्घटना टळली! कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग; ए.सी.सह घरातील किरकोळ साहित्य जाळून खाक!

माहूर:- शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील शेवाळे ले आउट मधील कचऱ्याच्या ढिगाने अचानक पेट घेतला अन् त्याची धग जवळील घरा पर्यंत पोहोचून डॉ.जुनेद बावानी यांच्या घरातील एसी, दार,खिडक्या व काही साहित्य जाळून खाक झाले.इतर ही घरा पर्यंत आग पोहचणार होती,मात्र वेळेवर माहूर नगर पंचायत चे अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टाळला.
सध्या जंगलातील वणव्यासह नागरी वस्तीतही आगीच्या ऊठसूट घटना होत असून आग ओकणाऱ्या सूर्याच्या तप्त उन्हामुळे आग भडकण्यास चालना मिळत असून,अशीच एक घटना शहरातील भर मध्यवस्तीतील वार्ड क्रमांक एक मधील शेवाळे लेआउट मधील खुल्या प्लॉटमध्ये तोडून ठेवलेल्या झाडाझुडपांनी अचानक दुपारी एकच्या दरम्यान अचानक पेट घेतल्यामुळे आगीची घटना घडली.  नगरपंचायतचे अग्निशमन दल वेळेवर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने आगीचा उडालेला प्रचंड लोळ नागरिकांच्या रहिवासी घरांना आपल्या भक्षस्थानी घेण्यापासून वाचला.या पूर्वी मागील काही दिवसात २ मे रोजी माहुर न्यायालय परिसरात आगीची घटना घडली होती. त्या घटनेला ६ दिवसही उलटत नाही तोच आज शणिवार दि. ७ मे रोजी पून्हा तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
शहरातील भर वस्तीतील वॉर्ड क्रमांक १ मधिल कपिलनगर परिसरातील विनायक शेवाळे यांच्या सर्व्हे नंबर १९७ मधिल ले आउट मध्ये ऐण भर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्लॉटची साफसफाई करून तोडून ढिग लाउन ठेवलेल्या काटेरी बाभळीच्या झाडाझुडपांच्या जळतणाने अचानक पेट घेउन, आगीचे प्रचंड ऊंच लोळ आकाशात उडाल्याने परिसरात  एकच धावपळ उडाली.आगीची घटना घडली तेथे लागूनच अनेक उच्चभ्रू लोकांची आलिशान निवासी घरे असून डॉ.जुनेद बावानी यांच्या घरातील ए.सी. घराची सॅनिटरी पाईप लाईन,दरवाजे,खिडक्या आगीच्या संपर्कात येउन जळाले.आगीचे रौद्र रूप पाहून डॉ.अजय जाधव,कोम्रेड मनोज कीर्तने यांनी तात्काळ नगर अध्यक्ष फिरोज दोसानी यांना भ्रमणध्वनी वरून सूचना देउन अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण केले.अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जिवाची पर्वा न करता अथक परिश्रम करून आग रहिवासी क्षेत्राकडे पसरू न देता वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.यामूळे संभावित मोठा अनर्थ टळला.नसता अनेक घरे या आगीच्या भक्षस्थानी पडली असती. गणेश जाधव,अविनाश रूणवाल,विजय शिंदे,रवी पाईकराव,या अग्निशमन दलाच्या जवानांनी भर वस्तीतील आगीची घटना यशस्वीपणे हाताळून नागरिकांचा भीतीने रोखलेला श्वास मोकळा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.