सेवा निवृत्त मुख्याध्यापक येरावार सर यांचा सपत्नीक सत्कार!

माहूर:- माहूर तालुक्यातील वडसा येथील मुख्याध्यापक बी. टी.येरावार हे सेवा निवृत्त झाल्याने निरोप समारंभाच्या छोटे खानी कार्यक्रमात त्यांचा आष्टा केंद्राच्या व वडसा शाळेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडसा येथील शाळेचे आदर्श, शिस्तप्रिय,कर्तव्यदक्ष उच्चश्रेणी मुख्याध्यापक बी.टी. येरावार नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना दिनांक १ मे रोजी निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अमजद खान तर आष्टा येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक खांडेकर,तंटामुक्त अध्यक्ष,संतोष महल्ले सुरेंद्र कुडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिकवणीची पद्धत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि क्षमाशील अशी वर्तणूक विशेषः आदर्श विद्यार्थी घडला पाहिजे या साठी येरावर सरांसोबत केलेले विद्यादानाचे कार्य नेहमी स्मरणात राहील.असे मत या वेळी बोलताना मुख्याध्यापक सप्नील खांडेकर यांनी व्यक्त केले तर सत्काराला उत्तर देताना बी. टी. येरावार सर म्हणाले की,आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे.ज्ञान,ज्ञानासारखे पवित्र कार्य करीत असताना विद्यार्थी शिक्षणात तडजोड न करता शिस्त लावली पाहिजे.संस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना तयार करणे काळाची गरज आहे.आज माझ्या केंद्रातील शिक्षकांनी केलेला हा माझा सन्मान आयुष्यभर स्मरणात राहील.असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी केंद्रातील शिक्षकाकडून येरावार यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.प्रास्तविक प्रतीक मांडवकर यांनी तर,सूत्रसंचालन माधव बाभळे यांनी केले.तर आभार गोरख जगताप यांनी मानले.या वेळी बाबू स्वामी, नितीन खरवडे , महेश गोविंदवार, प्रभू मंदुलवार,दिलीप भाऊ मंदेवाड, माने,सय्यद मोमीन,सुरेश पवार यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते मतीन टेलर,नजीर शेख,देविदास राठोड,महल्ले सर,भारत गावंडे, बालाजी मनदुलवार,गणेश बारलवर,गोनेवार यांची उपस्थिती होती.