लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना १०० सेकंद उभे राहून आदरांजली!

माहूर:- लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १०० व्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त माहूर नगर पंचायत कार्यालयात नागरिकांनी १०० सेकंद एका जागी स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहिली.

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त दि. १८ एप्रिल ते २२ मे कृतज्ञता पर्व म्हणून नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी नगरपंचायत पदाधिकारी, कर्मचारी,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठीत नागरिक यांना केलेल्या आवहानानूसार कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून आज शुक्रवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात त्यांना वंदन करुन १०० सेकंद स्तब्धता पाळून सर्वांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी तर प्रमुख उपनगराध्यक्ष नाना लाड, नगरसेवक अशोक खडसे, विजय कामटकर, गोपु महामुने,पत्रकार नंदकुमार जोशी,बजरंगसिंह हजारी,गोपाल नाईक,पद्माताई गिऱ्हे,नगरसेविका प्रतिनिधी रफिक सौदागर, नगरसेविका प्रतिनिधी निसार कुरेशी, सैय्यद इरफान, अफसर ठेकेदार, शिवसेना शहर प्रतीनिधी निरधारी जाधव, माजी नगरसेवक दिपक कांबळे,अमित येवतिकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष फिरोज दोसाणी व उपनगराध्यक्ष नाना लाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी विशाल शिंदे, विजय भगत, नंदकुमार जोशी यांनी छ. शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्ष दोसाणी म्हणाले की लोकराजा शाहू महाराज हे सर्व जनतेच्या, रयतेच्या अडीचनी सोडविण्यासाठी जनतेच्या मधी रमून जाऊन प्रत्यक्ष काम करायचे म्हणून च त्यांना लोकांसाठी काम करणारा लोकराजा म्हणून ओळखले जाते.असे शाहू महाराज यांच्या बदल गोरोवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन माहूर किनवट विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया संयोजक जीतू चोले यांनी केले. तर आभार सेना शहर प्रमुख निरधारी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंदाची सर्व उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी
देविदास सिडाम, विजय शिंदे,सुरेंद्र पांडे,शेख नय्यूम,जीवन खडसे,देशमुख,प्रदिप राठोड ,विशाल ढोरे,गणेश जाधव, अविनाश रूणवाल,शेंडे,आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती.