माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी पत्रकार संघाचा ही पुढाकार! तहसीलदार मार्फत संबंधितांना निवेदन!

माहूर:- माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 (अ) रस्त्याचे काम पूर्विच्या अंदाज पत्रका प्रमाणे न करता १०० फुट एवढे करून मधोमध दूभाजक व नाली या प्रमाने करण्यात यावे जेणे करून भविष्यात रहदारीला अडथका होणार नाही, तसेच अतिक्रमन होवून शहराचे विद्रुपीकरण ही होणार नाही.करिता या संदर्भात  नगराध्यक्ष फिरोज दोसानी, व सर्व पक्षीय कार्यकत्यांनी केलेली मागणी उचीत असून या मागणीला द. पॉवर ऑफ मिडीया  पत्रकार संघा सह अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.या आशयाचे निवेदन ही प्रशासनाला आज दिनांक ६ शुक्रवार रोजी देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार मार्फत देण्यात आलेल्या निवेदनावर पावर ऑफ  मराठवाडा विभागप्रमुख वसंत कपाटे, नंद कुमार जोशी,राजू दराडे,अपील बेलखोडे,राम दातिर,सुरेश गिऱ्हे,जयंत गिऱ्हे यांच्या तर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी,सचिव राजकुमार पडलवार, पुंडलिक पारटकर, गजानन भारती, संजय सुरोशे, नितेश बनसोडे, राज ठाकूर, गजू भारती मुरलिकर,कैलाश बेहेरे,साजिद खान, संजय सोनटक्के,प्रा.प्रवीण बिरादार,सिद्धार्थ तामगाडगे , अजयकुमार कंधारे,डॉ. जयप्रकाश द्रोणावार,अर्जून जाधव,अमजदखान लालखान पठाण, सुरज खोडके,रुपेश मोरे, ज्ञानेश्वर पवार, गजानन कुलकर्णी, राजकिरण देशमुख, अमजदखान हैदरखान,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत सर्वपक्षीय आंदोलनाचे प्रमुख नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी  यांना देण्यात आली आहे.