श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 361 ए रस्ता 100 फुट लांबीचा करा–अविनाश टनमने

माहूर:- श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 361ए रस्ता 100 फुट लांबीचा करण्यात येवून त्यात मध्यभागी दुभाजक, सर्विस रस्ता,दोन्ही बाजुने मोठी नाली बांधकाम करण्यात यावे असे निवेदना मार्फत जिल्हाधिकारी नांदेड़ यांच्या कडे माहुर तालूका किसान ब्रिगेड जिल्हा संघटक अविनाश टनमने यांनी केली आहे.

जनहितार्थ मागणी माण्य करण्यासाठी तालूक्यात किसान ब्रिगेड हि संघटना अविरत सतर्क राहते. महामार्ग अधिकारी यानी तांत्रिक बाब, अडचन दुरुस्त करून ७० फुट लांबीचा रोड ऐवजी १०० फुट लांबीचा शुशोभित रस्ता करण्यासाठी महामार्ग केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी व सर्व अधिनस्त अधिकारी यांना माहूर तालुका व शहरातील जनतेनी वारंवार निवेदन देऊन मागणी केली आहे. त्यास माहूर तालुका किसान ब्रिगेडचा जाहिर पाठिंबा असल्याचे तालूका संघटक आगाखान पठाण, विनोद खुपसे यांनी सांगितले.