माहूर:- मागील २५ वर्षा पूर्वी एका व्यक्तीने पंचशील ध्वजासाठी व सार्वजनिक कामासाठी दान दिलेल्या जमिनीचा फेरफार अनेक निवेदन देऊन व ग्रामपंचायत च्या वतीने नोटीस लाऊन सुद्धा होत नसल्याने आखेर न्यायिक मागणी साठी गुंडवळ येथील सरपंच व ग्राम पंचायत सदस्या सह गावकऱ्यांनी पंचायत समिती पुढे आज दिनांक ५ मे गुरुवार पासून उपोषणाला सुरवात केली आहे.

मौजे गुडवळ ता.माहूर येथील जागेचे मुळ मालक लक्ष्मण सुका वायबसे यांनी पंचशिल ध्वजासाठी व सर्वजनीक कामासाठी जागा दान दिली होती. त्या जागेवर २५ वर्षापासुन पंचशिल ध्वज आहे.व जागा सार्वजनीक वापरात आहे. परंतु जागा समाजाच्या नावे करण्या आधीच लक्ष्मण वायबसे यांचा मृत्यू झाला.त्या मुळे सदरील जागा गाव नमुना नंबर ८ वर घेण्यात आली नाही.जागा दान देणारे हे बौध्द समाजाचे होते.त्या जागे बाबत कोणाचा काही दावा सुद्धा नाही. त्या उपर ही ६ एप्रिल २२ रोजी ग्रामपंचायत गुंडवळ ने जाहीर नोटीस प्रकाशित करून सदरील ४३×४९ जागे बाबत कोणाच्या आक्षेप,हरकती सुचना असल्यास सात दिवसाच्या आत कळवावे अशी सूचना नोटीस बोर्डावर प्रकाशित करून दिली होती.त्या ग्रा.प.च्या नोटीसीला तब्बल १ महिना झाला असून कुठली हरकत कोणी घेतली नाही.तरीही ग्राम सेवक जागेचा फेरफार करीत नसल्याने दिनांक दिनांक २ मे रोजी गावकऱ्यांनी गट विकास अधिकारी माहूर यांच्या कडे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता.मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने जागेचा फेरफार रखडलेलेच आहे.परिणामी न्यायिक मागणी साठी सरपंच उत्तम खंदारे,ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी मोहन कनिराम आडे,रामेश्वर जाधव, माजी उपसरपंच राहुल कांबळे,बाबू खंदारे, अशपाल जमदाळे,उत्तम जमदाळे,विजयसिंह ठाकूर,सिद्धार्थ खंदारे,भीमराव कांबळे,वसंता गवळी यांनी आज गुरुवार पासून पंचायत समिती प्रशासकीय इमारती समोर उपोषणास सुरुवात केली आहे.हे उपोषण साखळी असून येत्या एक दोन दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास विविध राजकीय पक्ष व आंबेडकरी जनतेच्या पाठिंब्याने मोठे आंदोलन उभारू असा इशारा उपोषणाला पाठिंबा देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने,भीम टायगर सेनेचे राहुल भगत यांनी दिला आहे.
