लोकसहभाग व लोकवर्गणीतून माहूर तालुक्यातील मालवाडा व लांजी येथे तलावातील गाळ काढणी च्या कामाचे शुभारंभ!

माहूर:- अमृतमहोत्सवी अभियानांतर्गत लोकसहभाग व लोकवर्गणीतून माहूर तालुक्यातील मालवाडा व लांजी येथे तलावातील गाळ काढणी कामाचा शुभारंभ आज दिनांक ४ बुधवार रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्ग दर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांच्या हस्ते तर माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, माजी सभापती मारोती रेकुलवार,अमित येवतिकर, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.
सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या पुढाकाराने
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आज मालवाडा व लांजी येथे लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ झाला.लोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी पातळी वाढून गावातील नागरिक व सर्वच शेतकºयांचा फायदा होणार असल्यामुळे मालवाडा,लांजी प्रमाणे सर्वत्र ग्रामस्थांनी सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार किशोर यादव यांनी केले.पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने गाव व शिवाराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामाने तलावाची खोली वाढणार आहे असे मत नगराध्यक्ष फिरोज दोसांनी यांनी व्यक्त केले.या वेळी गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोती रेकुलवार, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अमित येवतिकर, माजी नगर सेवक राजाराम गंधेवाड,सुनील आडे,दिनेश कोंडे,प्रतीक कोपुलवार,राजू चव्हाण,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.