माहूर (इम्रान सुरय्या)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष निर्बंध असल्याने सर्वत्र सण उत्सव शासनाच्या नियमावलीमध्ये साजरे करावे लागले. पण, यंदा शासनाने नियमावलीत शिथीलता आणल्याने यंदाची ईद ही माहूर शहरात मोठ्या उत्साहात इदगाह व मस्जिद मध्ये सामूहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली.
मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र काल 2 मे रोजी दिसला.आज मंगळवार 3 मे रोजी देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर साजरी करण्यात आली.माहूर शहरात इदगाह,नगिना मस्जिद,सोनापिर दर्गाशरीफ, व तानुशा भानुशा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.नमाज नंतर धर्मगुरूनी केलेल्या दुवा (प्रार्थनेत)सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच एकात्मतेसाठी सामाजिक संदेश दिला. ईदगाह बाहेर नगराध्यक्ष फिरोज भय्या दोसानी,उप नगराध्यक्ष नाना लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,सभापती अशोक खडेसे, प्रदेश कार्यकारी सदस्य भगवान राव जोगदंड,मनोज कीर्तने,नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे,विजय कामटकर,विलास भंडारे, किशन राठोड,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,नगर सेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,राष्ट्रवादी शहर प्रमुख अमित येवतिकर,ज
यंत गीऱ्हे ,दत्तात्रेय शेरेकर,जयकुमार अडकिने,सुनील आडे,यांच्या सह अनेकांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी ईदगाह परिसरात पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या व्यातेरिक्त कुठल्याही शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी दिसून आले नाही.