माहूर(सरफराज दोसानी):- प्रशासकीय कामकाज अचूक आणि निर्दोष व्हावे, कोणतेही हितसंबंध जोपासले न जाता कोणावरही अन्याय होऊ नये, असे अपेक्षित असताना अतिदुर्गम माहूर तालुक्यात मात्र या परंपरेला उघड फाटा दिला जात आहे. चक्क तहसील कार्यालय,नगर पंचायत,कृषी विभाग,पोलीस विभाग,ग्रामीण रुग्णालय या प्रमुख विभागात बदली संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना तिलांजली दिली जात आहे.गेल्या 10-15 वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणात प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी चे लक्ष नसावे हे अनाकलनीच म्हणावे लागेल. या वासिलेबाज कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांची हतबलता ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे.


कर्मचाऱ्यांचे असो वा अधिकाऱ्यांचे, नियमित अंतराने स्थानांतरण केले जात नसेल तर त्यांचा कार्यात निरसता तर येतेच, पण नागरिकांशी हितसंबंध आल्याने एखाद्या प्रकरण्यात चुकीच्या पद्धतीने कामे होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय अधिक काळ एकाच पदावर वा एकाच ठिकाणी राहिल्यास आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याशिवाय इतर विभागातील कार्याचा अनुभव अशा कर्मचाऱ्यांना येत नाही. परिणामी, भविष्यात याचा फटका या कर्मचाऱ्यांमुळे शासन प्रशासनाला बसल्यास नवल वाटू नये.कारण सामान्य प्रशासन विभाग धृतराष्ट्राप्रमाणे बदली प्रक्रिया पार पाडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
—- बदली झाली तर अतिरिक्त पदभार नवीन फंडा!
नगर पंचायत,तहसील,या विभागाच्या कर्मचाऱ्यांची बदली झाली तर त्या ठिकाण चा पदभार स्वीकारून माहूर चा अतिरिक्त पदभार वसिले बाजी ने मिळवून एकच खुर्चीवर ठाण मांडून बसायची नवीन प्रथा माहूर मध्ये रुजू झाली आहे,तर ग्रामीण रुग्णालयात बदली हा विषयच दिसून येत नाही मागील १० वर्षापासून या ठिकाणी एकच व्यक्ती अधीक्षक म्हणून प्रभार सांभाळत आहे.यातूनच रुग्णालयात कोणी ही यावे टपली मारून जावे,या सदरात कर्तव्यावर नसताना काही कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून शासनाच्या निधीवर डल्ला मारला जात आहे.तर कृषी विभागाचा कोणी वालीच उरला नसून या ठिकाणी ही अनेक रिक्त पदे व वर्षोन वर्षे कर्मचारी ठान मांडून आहे.पोलीस विभागात खांदे पालाट चा खेळ सुरू असून कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात सेवा पूर्ण केल्यास त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात माहूर मध्येच नियुक्ती मिळते.त्या मुळे अदली बदली घर बदली या प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांना पोलीस ठाण्यात सुद्धा नियुक्ती मिळते.
