( काव्यसरीता ) जरा सावरा…जरा आवरा…!!!

जरा सावरा…जरा आवरा…!!!

मागे पडलाय तो काळ जो”चरखा”
चालवण्याचा होता..
आता मात्र “बुलडोझर”चे युग आले..
अन्याय अत्याचार व हक्का साठी उचलला तुम्ही आवाज तर

लचके घेण्या सरसावतील कुत्रे-कोल्हे..!!!
आज बापू हरले,बाबू सरले,भगतसिंग सुद्धा विसरलेले…
जो कामाचा तोच रिकामा अन् स्वाभिमान्यांच्या विरोधी उपसलेले भाले…!!!


आतल्या गाठीच्यांचा जमानाच तर आहे हा..
हातचा ठेवल्या शिवाय यांची नसतात ना गणितं…
राजकीय ‘लांभाशचाटू’ अखंड हलकटलेले बोटीसाठी…


जातीपातींची जुंपवून झुंज कसे साधतात हे स्वहीतं…!!!
गरज पडली तर हे माणूस ही कापून खातील स्वार्थासाठी…
धर्माच्या नावाने पेटवलेल्या ज्वाळा
क्षमनेच नसे ‘अर्थासाठी’…
थोडे भानावर या भावांनो, अन्यथा या वल्गनाच विनाश ठरतील भारतासाठी….!!!

हृदयाक्षर मिलिंद…!!!

 आपला दिवस मंगल जावो…!!!