मुक्या जीवांसाठी उन्हाळ्यात नगर पंचायत कडून `दाणा-पाणी`ची सोय !

माहूर:- वाढत्या उन्हामुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांचे हाल होत आहे. तीव्र उन्हात पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी माहूर नगर पंचायतच्या वतीने वसुंधरा दिनी झाडांवर “दाणा-पाणी” व ठिकठिकाणी प्लास्टिक टोपल्यांमध्ये पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.नगराध्यक्ष फिरोज दोसानी व मुख्याधिकारी किशोर यादव, उपनगराध्यक्ष नाना लाड,नगर सेवक प्रतिनिधी निराधारी जाधव, अपसर आली,इरफान सय्यद,रफिक सौदागर, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी नप चे कर्मचारी सुनील वाघ,देविदास जोंधळे,थोरात, दळवे, सुरेन्द्र पांडे,विजय शिंदे,गणेश जाधव,नईम पाशा यांच्या उपस्थिती मध्ये अग्निशमन इमारत व शहरात इतर अनेक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीसाठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी पशु-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे.पाण्यासाठी कासावीस झालेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली तर त्यांचे हाल थांबतील या हेतूने वसुंधरा दिनी नगर पंचायत प्रशासनाने हा उपक्रम राबविला.झाडा वर प्लास्टिक टोपली व बरण्या अडकवून त्यात पाण्यासह धान्य ठेवण्यात आले आहे.हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र राबविण्याची आज आवश्यकता आहे.असे मत या वेळी मुख्याधिकारी किशोर यादव यांनी व्यक्त केले.