“क्रांतीसुर्य बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृह आणि घन कचरा व्यवस्थापन साठी नगराध्यक्षांचे जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना साकडे!

माहूर:- तिथक्षेत्र माहूर शहराच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाईचे कामे करण्यासाठी 15 वा वित्त आयोग योजने अंतर्गत प्राप्त होणारा निधी कमी प्रमाणात असल्यामुळे श्री.रेणुका देवी संस्थान माहूरगड या संस्थानाकडून दरमहा 3.00 लक्ष रुपये याप्रमाणे एक वर्षासाठी 36.00 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना तर “क्रांतीसुर्य बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे” साठी 50.00 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात यावा या आशयाचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रत्यक्ष भेटून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिले.या वेळी उपनगराध्यक्ष नाना लाड,पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे यांची उपस्थिती होती.
माहूर हे तिर्थक्षेत्राचा ठिकाण असून देविच्या साडेतिन शक्तीपिठापैकी एक पूर्ण शक्तीपिठ श्री रेणुकादेवीच्या रुपाने या ठिकाणी कार्यरत आहे. तसेच भगवान दत्तात्रयाचे जन्मस्थान व निद्रास्थान तसेच माता अनुसया मंदिर, प्रसिध्द बाबासोनापीर दर्गा, गौतम बुध्द, पाडवलेणी, कैलासटेकडी, वनदेव, देवदेवश्वरी मंदिर परशुराम मंदिर अशा अनेक देवदेवतांनी निसर्ग रम्य पर्वतरांगा मध्ये वसलेल हे शहर असल्यामुळे दररोज हजारो भावीक दर्शनासाठी व यात्रा काळात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.सदरील भाविकाना सोईसुविधा देण्याच्या दृष्टीकोणातुन यापुर्वी 14 वा वित्त योजने अंतर्गत प्रति वर्षी 1.50 कोटी रुपयाच्या आसपास अनुदान प्राप्त होत होते. त्यातून घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत जास्तीचे कर्मचारी व यंत्रणा समाविष्ट असलेले निविदा काढून दरमहा 11.00 लक्ष रुपयाचे कंत्राट देवून कामे करण्यात येत होती. यामुळे घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत साफसफाईचे कामे चांगल्या प्रकारे होत होती.
परंतु 15 वा वित्त आयोग योजने अंतर्गत या कामासाठी अतिशय कमी प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे सदर कामे चांगल्या प्रकारे होणे शक्य होत नाही.तरी यामुळे श्री. रेणुका देवी संस्थान माहूरगड या संस्थानाकडून नगर पंचायत माहूरला दरमहा 3.00 लक्ष रुपये म्हणजेच एका वर्षा 36.00 लक्ष रुपये आपल्या स्तरावरुन आवश्यकते सुचना देवून निधी उपलब्ध करुन दयावा,आशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,तर सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट हे श्री रेणुका देवी संस्थान चे पद सिद्ध सचिव असल्याने त्यांना या विषयी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती यांनी प्रत्येक्षात भेटून विविध समस्येबाबत अवगत केले.तर माहूर शहरात बऱ्याच प्रमाणात आदिवासी समाज असल्याने माहूर नगर पंचायत ने शहरात “क्रांतीसुर्य बिरसा मुंडा सांस्कृतिक सभागृह बांधकाम करण्यासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देण्यात यावा असे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिले.या वेळी उपनगराध्यक्ष नाना लाड,पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे यांची उपस्थिती होती.